संदेशखाली येथील अनेक महिलांचे लैंगिक शोषण आणि जमीन हडप केल्याचा आरोप असलेला तृणमूल काँग्रेसचे नेता शाहजहान शेख याला कोलकाता उच्च न्यायालयाने दणका दिला आहे.न्यायालयाने त्याच्या अटकेला स्थगिती देण्यास नकार देत शाहजहान शेखला तात्काळ अटक करावे, असे कोलकाता उच्च न्यायालयाने सोमवार सांगितले.यासह शाहजहान शेख विरुद्धच्या सुओ मोटो खटल्यात ईडी, सीबीआय आणि राज्याचे गृहसचिव यांचा पक्षकार म्हणून समावेश करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.
शाहजहान शेख याने कोर्टात एक याचिका दाखल केली होती.या याचिकेमध्ये अटकेला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली होती.मात्र, कोलकाता उच्च न्यायालयाने ती फेटाळून लावली आहे.उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी तृणमूलचे खासदार अभिषेक बॅनर्जी आणि राज्याच्या अन्य दोन मंत्र्यांच्या टिप्पण्यांवरही कठोर भूमिका घेतली आणि म्हणाले की, न्यायालयाने शाहजहान शेखच्या अटकेला कधीही स्थगिती दिली नाही. त्याला अटक झाली पाहिजे, असे न्यायालयाने सांगितले.तसेच संदेशखाली भागात कलम १४४ लागू आहे, तेथील लोक चिडलेले असताना देखील राजकारण्यांनी तेथे जाण्याची गरज काय? असा सवाल देखील न्यायालयाने यावेळी केला.
हे ही वाचा:
शर्टावरील अरेबिक शब्द पाहून पाकिस्तानात महिलेवर जमावाचा हल्ला
‘सुशांतसारखे टोकाचे पाऊल उचलण्याच्या विचारात होतो’
मुस्लीम समाजाने पंतप्रधान मोदींना विरोध करू नये
‘सीता’ आणि ‘अकबर’ सिहांच्या जोडीचा वाद, वन अधिकारी निलंबित!
तृणमूल काँग्रेसचे नेता शाहजहान शेख अद्याप फरार असून पोलीस देखील त्याचा शोध घेत आहेत.दरम्यान, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाने सांगितले की, टीएमसी शाहजहान शेख आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध आदिवासी कुटुंबांकडून “लैंगिक अत्याचार आणि जमीन हडपण्याच्या” सहा एकूण 50 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.यासह राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आमच्याकडे सुमारे १,२५० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.यामध्ये ४०० तक्रारी जमिनीच्या समस्यांशी संबंधित आहेत.