मणिपूर सरकारने राज्यातील पाच हजार ४५७ अवैध स्थलांतरितांची ओळख पटवली असल्याचे मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी सांगितले. मणिपूर सरकारने ७ मे २०२४पर्यंत कमजोंग जिल्ह्यात राज्यातील एकूण पाच हजार ४५७ अवैध स्थलांतरिता शोध लावला आहे. एकूण पाच हजार १७३ बेकायदा स्थलांतरितांचा बायोमेट्रिक डेटा आतापर्यंत गोळा करण्यात आला असून हद्दपारीची प्रक्रिया सुरू आहे,’ असे मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी ‘एक्स’वर लिहिले आहे.
‘आम्ही आतापर्यंत सापडलेल्या सर्व अवैध स्थलांतरितांना मानवतावादी मदत देत आहोत. चिंताजनक परिस्थिती असूनही, आम्ही ते अत्यंत संवेदनशीलतेने हाताळत आहोत,’ अशी माहिती सिंह यांनी दिली. गेल्या आठवड्यात, मणिपूरमधून ३८ बेकायदा स्थलांतरितांना म्यानमारमध्ये पाठवण्यात आले. त्यामुळे ८ मार्चपासून निर्वासित केलेल्या अवैध म्यानमारच्या स्थलांतरितांची संख्या ७७वर पोहोचली आहे.
हे ही वाचा:
“खासदारकी पुन्हा मिळवण्यासाठी दावोसच्या गुलाबी थंडीत काय केलंत?”
अल्पवयीन मुलीला धावत्या रेल्वेखाली फेकले
आता गांजा लावून पाकिस्तान गाठणार आर्थिक उच्चांक
कट्टरतावादी इस्लामी जमावाचा अहमदाबादमधील निश्कल्की मंदिरावर प्राणघातक हल्ला!
२ मे रोजी झालेल्या कारवाईची माहितीही सिंह यांनी ‘एक्स’वरून दिली होती. ‘कोणताही भेदभाव न करता, आम्ही म्यानमारमधील अवैध स्थलांतरितांच्या निर्वासनाचा पहिला टप्पा आज पूर्ण केला आहे. मणिपूरच्या मोरेहमार्गे आणखी ३८ स्थलांतरितांना परत पाठवण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात एकूण ७७ अवैध स्थलांतरितांना हद्दपार करण्यात आले आहे. तर, हस्तांतरण कार्यक्रमात एका भारतीयाला म्यानमारमधून परत आणण्यात आले. राज्य सरकारकडून बेकायदा स्थलांतरितांची ओळख पटवणे सुरू आहे आणि त्याच वेळी बायोमेट्रिक माहिती जमा केली जात आहे. आपल्या सीमा आणि देश सुरक्षित ठेवूया,’ असे त्यांनी ‘एक्स’वर नमूद केले आहे.