मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी मुंबईत ३० हजार पोलीस तैनात

आचारसंहिता काळात ४ हजार ४९२ जणांवर प्रतिबंधक कारवाई

मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी मुंबईत ३० हजार पोलीस तैनात

विधानसभा निवडणूक-२०२४ च्या मतदानाच्या दिवशी मुंबईत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी मुंबईत ३० हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान मुंबई पोलिसांनी निवडणुका आचारसंहिता काळात ४ हजार ४९२ जणांवर प्रतिबंधक कारवाई केली आहे, या काळात पोलिसांनी जवळपास रोकड, मौल्यवान वस्तू,मद्य आणि अमली पदार्थ असा एकूण १७५ कोटी रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने बुधवारी होणारे मतदान प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पाडण्यासाठी तसेच मुंबईत कायदा सुवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मुंबई पोलिसाकडून मुंबई पोलीस आयुक्त, विशेष पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सह आयुक्त (का. व सु.) यांच्या देखरेखीखाली बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आलेले आहे.

हे ही वाचा:

बुडत्याला ५ कोटीच्या पुडीचा आधार…

आज विधानसभेसाठी होणार मतदान

सोमेश टोचतो, सज्जादमुळे गुदगल्या होतात हेच तर परिवर्तन आहे…

काँग्रेसच्या महिला विरोधी धोरणाचा हा आणखी एक नमुना!

मुंबई पोलीस दलाकडून ५ अपर पोलीस आयुक्त, २० पोलीस उप आयुक्त, ८३ सहायक पोलीस आयुक्त यांच्यासह दोन हजाराहून अधिक पोलीस अधिकारी व पंचविस हजाराहून अधिक पोलीस अंमलदार, ३ दंगल नियंत्रण पथक (RCP) बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेले आहेत. तसेच वाहतूक विभागामार्फत स्वतंत्रपणे १४४ अधिकारी व एक हजाराहून अधिक पोलीस अंमलदार बंदोबस्त कर्तव्याकरीता नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांचेसोबत चार हजाराहून अधिक होमगार्ड असे जवळपास ३० हजार मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. याशिवाय महत्वाच्या ठिकाणी २६ केंद्रीय सुरक्षा दले आणि राज्य सुरक्षा दले (CAPF / SAP) यांची निवडणूक कामी नेमणूक करण्यात आलेली आहे.

विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने आचारसंहिता लागू झाले पासून सोमवार पर्यत जवळजवळ १७५ कोटी रूपये किंमत असलेले रोख रक्कम, मौल्यवान वस्तू, मद्य आणि अंमली पदार्थ इत्यादी जप्त करण्यात आले आहे,मुंबई सह उपनगरात विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत ४ हजार ४९२ जणांवर प्रतिबंधक कारवाईत करण्यात आले आहे.

Exit mobile version