मंगळावरही दिसला ‘अरोरा’

मंगळावरही दिसला ‘अरोरा’

संयुक्त अरब अमिरातीने मंगळाभोवती सोडलेल्या यानाने मोठा शोध लावला आहे. या यानाने चक्क मंगळावरील अरोऱ्याचे चित्र टिपले आहे. त्यामुळे मंगळावरील सुंदर सृष्टीचमत्कार मानवाला दिसला आहे.

अरोरा म्हणजे पृथ्वीच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवाजवळील भूभागावर पहायला मिळणारा चमत्कार आहे. सुर्य किरणांमधल्या विशिष्ट तरंगलांबींचा सामना पृथ्वीच्या चुंबकिय क्षेत्राशी होतो. त्यावेळेला वातावरणात घडणाऱ्या काही रासायनिक क्रियांमुळे तेथील वातावरणात विविध रंगांची उधळण होते. अशाप्रकारची वातावरणीय घटना मंगळावर देखील पहायला मिळाली आहे.

सामान्यतः उत्तर आणि दक्षिण ध्रुवाजवळच्या भूप्रदेशात अरोरा पहायला मिळतो. पृथ्वीसारखाच असलेल्या मंगळावरील अरोऱ्याबद्दल शास्त्रज्ञांनी माहिती उघड केली नव्हती. आता संयुक्त अरब अमिरातीच्या यानाने आता या अरोऱ्याचे फोटो टिपले आहेत. ‘होप’ नावाच्या या यानाने अल्ट्राव्हायोलेट स्पेक्ट्रम वापरून या अरोऱ्याचा १०३.४ नॅनोमीटर तरंगलांबी असलेला फोटो टिपला आहे. ही तरंगलांबी दृश्य तरंगांपेक्षा जराशी लहान आहे परंतु क्ष-किरणांपेक्षा अधिक लांब आहे.

मंगळावरील अरोरा मानवाच्या सामान्य डोळ्यांना दिसू शकत नाहीत. पृथ्वीवरील अरोऱ्याप्रमाणे मंगळाचा अरोरा देखील सुर्याकडून आलेल्या विद्युत भारित कणांमुळे निर्माण होतो.

हे ही वाचा:

एलआयसीचा आयपीओ डिसेंबर महिन्यापर्यंत?

कोरोना पाठोपाठ देशात झिकाचा अलर्ट

… तर शनिवारी-रविवारीही दुकानं उघडी ठेवणार

विदर्भातील तांदूळ घोटाळ्याचे धागेदोरे वरपर्यंत

विद्युत भारित कण मंगळाच्या वातावरणापर्यंत पोहोचले की त्यांचा संबंध या ग्रहाच्या चुंबकीय क्षेत्राशी येतो. हे विद्युत भारित कण जेव्हा ऑक्सिजन मुक्त करतात त्यावेळेला अरोऱ्याची निर्मिती होते.

मंगळ हा कित्येक कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीसारखा दाट वातावरण असलेला ग्रह असावा आणि त्यावर वाहते पाणी देखील असावे असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. नंतरच्या काळात या ग्रहाचा गाभा लवकर थंड झाल्याने आज या ग्रहाचे रुपांतर रेताड वाळवंटात झाले आहे.

Exit mobile version