सिक्कीममध्ये लष्कराचे वाहन दरीत कोसळून मोठा अपघात झाल्याची माहिती आहे. गुरुवार, ५ सप्टेंबर रोजी ही दुर्घटना घडली आहे. ३०० फूट दरीत लष्कराचे वाहन कोसळून झालेल्या अपघातात चार जवानांना हौतात्म्य मिळाले आहे. सिक्कीमच्या पाकयोंग जिल्ह्यात रेशीम मार्गावर हा अपघात झाला.
सिक्कीमच्या पाकयोंग जिल्ह्यात लष्कराचे एक वाहन ३०० फूट खोल दरीत कोसळल्याने अपघात झाला आहे. या अपघातात चार जवानांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. लष्कराचे वाहन पश्चिम बंगालमधील पेडोंग येथून सिक्कीममधील पाकयोंग जिल्ह्यातील रेशीम मार्गावरील झुलुककडे जात होते. यावेळी हा अपघात झाला. सर्व लष्करी जवान पश्चिम बंगालमधील बिनागुरी येथील युनिटचे होते. लष्कराच्या ताफ्यात तीन वाहनांचा समावेश होता. यातील एका वाहनाचा अपघात झाला. लष्कराच्या ताफ्यात तीन सैन्य अधिकारी, दोन जेसीओ आणि ३४ सैनिक होते. तीन वाहनांच्या ताफ्यात एक जिप्सी, एक ट्रक आणि एक रुग्णवाहिका होती.
हे ही वाचा :
‘सनातन’मध्ये महिलांचा आदर, मेहनाज बनली मीनाक्षी, मुलेही झाली ‘लव-कुश’
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारांचे वितरण
अटल सेतूवरून उडीमारून बँकरची आत्महत्या !
बेकायदेशीर मशिदीचा प्रश्न विचारला म्हणून काँग्रेसच्या आमदारावर सहकारी आमदार भडकले!
या दुर्घटनेवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, “सिक्कीममधील पाकयोंग जिल्ह्यात झालेल्या अपघातात लष्करी जवान शहीद झाल्यामुळे दुःख आहे. शोकग्रस्त कुटुंबांप्रती मी संवेदना व्यक्त करतो.” काही दिवसांपूर्वी अरुणाचल प्रदेशातही लष्कराच्या वाहनाला अपघात झाला होता. या दुर्घटनेत लष्कराच्या तीन जवानांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता तर चार जण जखमी झाले होते. ऑगस्ट २०२३ मध्ये लडाख येथे लष्कराच्या वाहनाला दरीत कोसळून अपघात झाला होता. यात नऊ जवानांनी आपले प्राण गमावले होते.