जबलपूरमध्ये सैन्य दलाच्या गाडीला अपघात; महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण

आणखी एक जवान गंभीर जखमी

जबलपूरमध्ये सैन्य दलाच्या गाडीला अपघात; महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण

मध्य प्रदेशमधील जबलपूरहून बंगळूरूला जाणाऱ्या सैन्य दलाच्या गाडीचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. एका खासगी टँकरने सैन्य दलाच्या गाडीला जोरदार धडक दिली असून या अपघातात एका जवानाचा मृत्यू झाला आहे. तर एक जवान गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण आले आहे. अपघाताची माहिती मिळताच संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

सांगली जिल्ह्यातील लोणारवाडी गावचे सुपुत्र आणि पॅरा कमांडोचे हवालदार पोपट भगवान खोत (वय ३४ वर्षे) यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. तर त्यांचा सहकारी गंभीर जखमी आहे. बुधवार, ८ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास जबलपूर जवळ हा अपघात झाला. रुग्णालयात पोहचण्याचा अगोदर पोपट खोत यांची प्राणज्योत मालवली. पॅरा कमांडोचे हवालदार पोपट भगवान खोत यांच्या मृत्यूची वार्ता कळताच संपूर्ण कवठेमहांकाळ तालुक्यावर शोककळा पसरली आहे. जवानांची गाडी जबलपूरहून बंगळूरूला जात असताना एका खासगी टँकरने सैन्य दलाच्या गाडीला पाठीमागून जोरदार धडक दिली.

पोपट खोत यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई आणि बहिणी असा परिवार आहे. पोपट खोत यांचं पार्थिव त्यांच्या गावी लोणारवाडी येथे आणलं जात आहे. कर्त्यव्य बजावत असताना, पोपट खोत यांचा अपघाती मृत्यू झाला असून, त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.  पोपट खोत यांचे पार्थिव त्यांच्या मुळगावी  आणण्यात येणार आहे. निधनाच्या बातमीने परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

हे ही वाचा:

अमेरिकेच्या अर्थसहाय्याने अदानी समूह श्रीलंकेत उभारणार बंदर, चीनची कोंडी

हमासच्या नरसंहारातून बचावलेल्या विद्यार्थ्यांनी कथन केला प्रसंग

व्यक्तीच्या मृत्यूनंतर नऊ महिन्यांनी त्याचं व्यक्तीच्या मृत्यूच्या शिक्षेवर पाकिस्तानात होणार सुनावणी

अफगाण खेळाडूंना इरफान पठाणचा खास पाहुणचार!

दोन महिन्यापूर्वी लडाखमधील कायरी भागात भारतीय लष्कराच्या वाहनाचा भीषण अपघात झाला होता. लष्काराचे वाहन दरी कोसळून झालेल्या या अपघातात नऊ जवानांचा मृत्यू झाला आहे. तर, काही जवान जखमी झाले होते.

Exit mobile version