21 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरविशेषपुण्यातील पूरस्थितीत बचावकार्यासाठी लष्कराचे जवान मैदानात

पुण्यातील पूरस्थितीत बचावकार्यासाठी लष्कराचे जवान मैदानात

सतत पडत असलेल्या पावसामुळे पुण्याच्या सखल भागात पाणी साचले

Google News Follow

Related

पुणे जिल्ह्यासह शहरात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक नागरिक पुराच्या पाण्यात अडकून पडले असून प्रशासनाकडून बचावकार्याला सुरुवात करण्यात आली आहे. नागरिकांनी घाबरून जावू नये असं आवाहन त्यांना करण्यात येत आहे. बचावकार्याला वेग यावा म्हणून आता लष्कराच्या जवानांना पाचारण करण्यात आले आहे. त्यामुळे पुण्यात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मदतीसाठी भारतीय सैन्यदल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान, अजित पवार यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट देऊन शहरातील बचाव आणि मदतकार्याच्या पूर्वतयारीचा घेतला आढावा.

सतत पडत असलेल्या पावसामुळे पुण्याच्या सखल भागात पाणी साचले असून अशा परिस्थितीत नागरिकांची पुराच्या पाण्यातून सुटका करण्यासाठी लष्कराचे बचाव आणि मदतकार्य पथक पुण्यात दाखल झाले आहे. या पथकामध्ये लष्कराचे जवान, अभियांत्रिकी कृती दल तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या पथकासोबत आपत्तीने प्रभावित लोकांना मदत करण्यासाठी तसेच तत्पर आणि परिणामकारक मदतकार्यासाठी आवश्यक बचाव बोटी आणि अत्यावश्यक वैद्यकीय सेवा साधने आहेत. तसेच लष्कराच्या अतिरिक्त पथकांना सज्ज ठेवण्यात आली आहेत.

हे ही वाचा:

राष्ट्रपती भवनातील दरबार हॉल, अशोक हॉल आता ‘गणतंत्र मंडप’ आणि ‘अशोक मंडप’

मुख्यमंत्री केजरीवालांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत ८ ऑगस्टपर्यंत वाढ !

सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय; खनिजांवरील ‘रॉयल्टी’ हा कर मानला जाऊ शकत नाही

विधानसभेला मनसे २५० जागा लढवणार

गुरुवार, २५ जुलै रोजी स्थानिक प्रशासनाकडून लष्कराच्या मदतीसाठी विनंती करण्यात आली होती. या विनंतीला प्रतिसाद देत लष्कराच्या कृती दलाला तातडीने प्रभावित भागाकडे पाठवण्यात आले. एकूण ८५ जणांचा समावेश असलेल्या या पथकामध्ये लष्कराचे जवान, अभियांत्रिकी रेजिमेंट आणि लष्करी रुग्णालये तसेच इतर तज्ज्ञ घटकांतील वैद्यकीय पथके सहभागी आहेत. तसेच गरज लागली तर मदतीसाठी भारतीय हवाई दलालादेखील सज्ज राहण्यास सांगितले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा