29 C
Mumbai
Friday, September 20, 2024
घरविशेषजम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये चकमक, लष्कराचा कॅप्टन हुतात्मा !

जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये चकमक, लष्कराचा कॅप्टन हुतात्मा !

शोध मोहिमेदरम्यान घटनास्थळी रक्ताचे डाग, रायफल जप्त

Google News Follow

Related

जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात बुधवारी (१४ ऑगस्ट) सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाल्याचे वृत्त आहे. जोरदार गोळीबार होत असतानाही दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. या चकमकीत एक दहशतवादी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. सुरक्षा दलांनी शोधमोहिमेदरम्यान एम ४ रायफल जप्त केल्या आहेत. याशिवाय दारूगोळा आणि रसद सामग्रीही जप्त करण्यात आली आहे. यासोबतच तीन बॅग जप्त करण्यात आल्या आहेत. या चकमकीत लष्कराचा एक कॅप्टन हुतात्मा झाला आहे. ४८राष्ट्रीय रायफल्सचा भारतीय लष्कराच्या कॅप्टनला वीर मरण आले आहे.

डोडाच्या अस्सार भागातील शिवगढ-असर पट्ट्यात लपलेल्या दहशतवाद्यांच्या गटाचा शोध घेण्यासाठी संयुक्त पथकाने सुरू केलेल्या घेराबंदी आणि शोध मोहिमेदरम्यान घनदाट जंगलाच्या परिसरात ही चकमक झाली. मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी डोडाच्या शिवगढ-असर पट्ट्यात लपले असल्याचे मानले जात आहे. सुरक्षा दलाच्या शोधमोहिमे दरम्यान या भागात रक्ताचे डाग दिसल्यामुळे त्यापैकी एक जखमी झाला असल्याचे सांगितले जात आहे. भारतीय लष्कराच्या व्हाईट नाइट कॉर्प्सने एका पोस्टमध्ये म्हटले की, गुप्त माहितीच्या आधारे इंडियन आर्मी आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या संयुक्त शोध मोहीम पटनीटॉप जवळील अकर जंगलात सुरू करण्यात आली आहे. दहशतवाद्यांचा शोध सुरु असून कारवाई करण्यात येत आहे.

हे ही वाचा:

केजरीवालांना दिलासा नाहीच; अंतरिम जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

रोहिंग्या, बांगलादेशी मुस्लीम घुसखोरांना गावात राहण्यास, व्यापार करण्यास मनाई

नालासोपारामध्ये पोलिसांची कारवाई; दोन कोटींच्या अमली पदार्थांसह नायजेरीयन महिलेला ठोकल्या बेड्या

अराजकतेच्या गर्तेत सापडलेला बांगलादेश आता आर्थिक संकटाच्या छायेत!

याआधी मंगळवारी उधमपूरच्या रामनगर तहसीलमधील दुडू बसंतगडच्या डोंगराळ भागात चार दहशतवादी दिसले होते. रात्री उशिरा सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या उपस्थितीवर शोध मोहीम सुरू केली. सुरक्षा दलांचा घेराव वाढवल्याचे पाहून दहशतवादी सेओजधर मार्गे दोडा जिल्ह्याच्या दिशेने निघाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
178,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा