भारतीय लष्कर आणि जम्मू- काश्मीर पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला आहे. राष्ट्रीय महामार्ग ४४ वर मोठा अपघात टाळण्यात लष्कराच्या जवानांना मोठे यश मिळालं आहे. अमरनाथ यात्रेहून पंजाबमधील होशियारपूरला जाणाऱ्या बसचे ब्रेक अचानक निकामी झाल्यामुळे मोठा अपघात होणार होता. अशातच भारतीय लष्कराच्या जवानांनी अतिशय हुशारीने वाहनावर नियंत्रण मिळवल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
माहितीनुसार, बसमध्ये ४० प्रवासी होते. हे सर्व अमरनाथच्या दर्शनासाठी आले होते. दर्शन घेऊन यात्रा पूर्ण करून ते पंजाबमधील होशियारपूर येथे जात होते. यावेळी बानीहालजवळ नाचलेना येथे चालकाला बसवर नियंत्रण ठेवता येत नव्हते. तेव्हा लक्षात आले की बसचे ब्रेक फेल झाले आहेत. याची माहिती बसमधील भाविकांना कळताच त्यांनी एकच गोंधळ केला. शिवाय काहींनी चालत्या बसमधून उड्या घेतल्या. मात्र, यात काही जण जखमी झाले. जखमींमध्ये सहा पुरुष, तीन महिला आणि एका लहान मुलाचा समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे. बसचे सुटलेले नियंत्रण आणि भाविक बसमधून उड्या घेत असल्याचं पाहून लष्कराच्या जवानांनी तात्काळ बसच्या मागे धाव घेतली. बस पुढे जाऊन दरीत पडण्याची शक्यता होती. अशावेळी जवानांनी बसच्या टायरखाली रस्त्यावरील मोठे दगड टाकण्याचे कामे केले. अथक प्रयत्न केल्यानंतर जवानांना बस थांबवण्यात यश आले. यानंतर तातडीने रुग्णवाहिकेला बोलावण्यात आले आणि जखमींना लगेच प्राथमिक उपचार देण्यात आले.
हे ही वाचा:
बांसुरी स्वराज यांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र; राहुल गांधींच्या वक्तव्यांवर कारवाईची मागणी
सभागृहात शिवीगाळ करणाऱ्या अंबादास दानवेंचे निलंबन
धर्मांतर होत राहिल्यास देशातील बहुसंख्य लोकसंख्या एक दिवस अल्पसंख्याक होईल
बार्बाडोसमध्ये अडकलेला भारतीय संघ विश्वचषक घेऊन मायदेशी येण्यास सज्ज!
या थरारक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय की, प्रवासी बसच्या मागच्या दरवाज्यातून उड्या मारत आहेत. त्यामागून सुरक्षा दलाचे जवान पळत आहेत. बस थांबवण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न केला जात असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे.
The brakes of a bus carrying Amarnath pilgrims failed on a slope while returning from Baltal to Hoshiarpur. Some people jumped out of the moving bus. Police and security forces stopped the bus with great effort. 8 people were injured in the incident. The pilgrims were from… pic.twitter.com/Y6mnmHQpPG
— Gagandeep Singh (@Gagan4344) July 2, 2024