जम्मू-काश्मीर: राजौरीमध्ये भूसुरुंग स्फोटात एक जवान हुतात्मा, दोन जवान जखमी!

जखमी जवानांवर उपचार सुरु

जम्मू-काश्मीर: राजौरीमध्ये भूसुरुंग स्फोटात एक जवान हुतात्मा, दोन जवान जखमी!

जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील नौशेरा भागात भूसुरुंगाच्या स्फोटात एक जवान हुतात्मा झाला आहे. तर दोन जवान जखमी झाले असून त्यापैकी एका जवानाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

फॉरवर्ड डिफेन्स लाइन (FDL) पासून सुमारे ३०० मीटर अंतरावर ८० व्या इन्फंट्री ब्रिगेड अंतर्गत १७ व्या शीख लाइट बटालियनच्या जबाबदारीच्या (AOR) परिसरात सकाळी १०:३० च्या सुमारास ही घटना घडली. हा स्फोट झाला तेव्हा लष्कराचे तीन जवान नियंत्रण रेषेवर नियमित निरीक्षण करत होते.

हे ही वाचा:

पाकिस्तानवर हवाई हल्ला केल्यानंतर इराणवर पुन्हा दहशतवादी हल्ला

अफगाणिस्तानला पराभूत करून रोहित शर्माने मिळवले मोठे यश

अयोध्येला एटीएस कमांडोचे सुरक्षा कडे

जया शेट्टींनी कबड्डीचीच नव्हे तर अनेक खेळांची केली सेवा!

स्फोटानंतर जवानांना तातडीने उधमपूरच्या कमांड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यामध्ये गंभीर स्वरूपात जखमी असलेल्या जवानाला जागीच वीर मरण आले तर दोन जवानांना तातडीने विमानाने उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. दरम्यान, या दुर्घटनेत हुतात्मा झालेल्या आणि जखमी झालेल्या जवानांची माहिती लष्कराकडून देण्यात आलेली नाही.गेल्या वर्षीही जम्मू विभागातील राजौरी जिल्ह्यात एलओसीजवळ भूसुरुंगाचा स्फोट झाला होता, त्यात लष्कराचे दोन पोर्टर जखमी झाले होते.

 

Exit mobile version