जम्मू आणि काश्मीरच्या श्रीनगरमधील जंगली भागात शुक्रवारी (६ डिसेंबर) शोध मोहिमेदरम्यान एका लष्करी जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दचीगाम भागात मंगळवारी झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबा (एलईटी) दहशतवादी जुनैद अहमद भट मारला गेल्यानंतर शोधमोहीम राबण्यात आली होती.
“A” श्रेणीतील दहशतवादी म्हणून ओळखला जाणारा जुनैद अहमद भट हा २० ऑक्टोबर रोजी गांदरबल बोगद्याच्या बांधकाम साइटजवळ झालेल्या हल्ल्यात सामील होता. या हल्ल्यात स्थानिक डॉक्टर आणि सहा गैर-स्थानिक मजुरांचा मृत्यू झाला होता.
हे ही वाचा :
बांगलादेशातील परिस्थितीवर जगाचे मौन, पवन कल्याण म्हणाले- आता तुमचा राग कुठे आहे?
शंभूराजे म्हणाले, ठाकरेंनी आमच्याकडे बोट दाखवून स्वतः मुख्यमंत्री झाले!
आता बदल्याचे नाहीतर बदल दाखवण्याचे राजकारण!
आंबिवलीच्या इराणी वाडीत मुंबई पोलिसांवर दगडकाठ्यांनी हल्ला, ५ अटकेत
दरम्यान, दहशतवाद विरोधी कारवाई दरम्यान सुरक्षा दलांकडून शोध मोहीम सुरु आहे. याच शोधमोहिमेदरम्यान लष्कराच्या ३४ आसाम रायफल्समधील जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. जसविंदर सिंग असे या जवानाचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी हरवानच्या फकीर गुजरी भागात दहशतवाद्यांचा शोध घेत असताना त्याला हृदयविकाराचा झटका आला.