भारतीय लष्कर आणि आसाम रायफल्सने २६ मार्च ते २९ मार्च दरम्यान मणिपूरच्या कांगपोक्पी, तेंग्नौपाल, चंदेल, सेनापती, जिरीबाम आणि बिष्णुपूर जिल्ह्यांमध्ये केलेल्या कारवाईत मोठे यश मिळवले आहे. लष्कराच्या कारवाईत २९ शस्त्रे, सुधारित उपकरणे, ग्रेनेड, दारूगोळा आणि इतर युद्धाशी संबंधित साहित्य जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई मणिपूर पोलिस, सीआरपीएफ, बीएसएफ आणि आयटीबीपी यांच्या समन्वयाने करण्यात आली होती.
संरक्षण मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, कांगपोक्पी जिल्ह्यातील एनपी खोलेन भागात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा असल्याची गुप्तचर माहिती मिळाली होती. माहितीच्या आधारे भारतीय लष्कर आणि मणिपूर पोलिसांनी २६ मार्च २०२५ रोजी संयुक्त कारवाई सुरू केली आणि दोन एके सिरीजमधील शस्त्रे, एक कार्बाइन आणि ७.६२ मिमी सेल्फ लोडिंग रायफल (एसएलआर), दारूगोळा आणि युद्धजन्य वस्तूंसह अनेक विध्वंसक शस्त्रे जप्त केली.
हे ही वाचा :
निफ्टी आणि सेन्सेक्समधून ८ ते १२ टक्के परतावा मिळण्याची अपेक्षा
संभलमध्ये ईदच्या नमाजासाठी कडेकोट बंदोबस्त
GROK 3 सह स्टुडियो घिबली शैलीतील ईमेज कशी तयार करावी: सविस्तर वाचा
२७ मार्च २०२५ रोजी, तेंग्नौपाल जिल्ह्यातील परबुंग येथे संशयास्पद व्यक्तींच्या हालचालींवर कारवाई करताना, सैन्याने त्वरीत घेराव घातला आणि परिसरात शोध मोहीम राबवली. या मोहिमेत तीन सुधारित मोर्टार (पोम्पिस) आणि तीन सुधारित स्फोटक उपकरणे (आयईडी) जप्त करण्यात आली.
तसेच सेनापती जिल्ह्यात, आसाम रायफल्सने चांगोबांग येथून चार सिंगल बॅरल बोल्ट अॅक्शन रायफल, एक पिस्तूल आणि मॅगझिन, ७.६२ मिमी दारूगोळ्याचे २० राउंड, एक इम्प्रोव्हायज्ड प्रोजेक्टाइल लाँचर आणि तीन जिवंत ग्रेनेड जप्त केले. जप्त केलेली सर्व शस्त्रे मणिपूर पोलिसांना सुपूर्द करण्यात आली आहेत.