भारतीय लष्कराने शुक्रवारी (५ एप्रिल) रोजी पहाटे उरीमध्ये दहशतवाद्यांची घुसखोरी हाणून पाडली. एलओसीच्या रुस्तम पोस्ट परिसरात घुसखोरीचा प्रयत्न फसवून लष्कराने एका दहशतवाद्याला ठार केले आहे. या भागात अजूनही लष्कराची कारवाई सुरू आहे.
लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चकमकीनंतर एक दहशतवादी मारला गेला असून परिसरात शोध मोहीम सुरु आहे.दहशतवाद्यांच्या एक गट भारतात घुसण्याच्या प्रयत्न करत होता, मात्र भारतीय लष्कराच्या जवानांनी केलेल्या प्रभावी गोळीबारामुळे त्यांचा कट हाणून पाडत त्यांना परतवून लावले. गोळीबारानंतर अतिरिक्त फौजा घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत, अशी माहिती लष्कराच्या सूत्रांकडून मिळाली.
हे ही वाचा:
भाजपच्या स्थापनादिनी एक लाखांहून अधिक लोक पक्षात सामील होणार!
अर्थशास्त्रज्ञांना जमलं नाही ते चहा विकणाऱ्याचा मुलगा पंतप्रधान झाल्यावर करून दाखवलं!
काँग्रेसचा ‘हात’ सोडणाऱ्या गौरव वल्लभ यांचा भाजपात प्रवेश
मोईत्रा यांच्या विरोधात ईडीकडून मनी लाँडरिंगचा गुन्हा
दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथे मंगळवारी (३ एप्रिल) रात्री पोलीस आणि गुंडांमध्ये गोळीबार झाला.या गोळीबारात पोलीस उपनिरीक्षक दीपक शर्मा जखमी झाले. त्यांना तातडीने कठुआ येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तसेच या गोळीबारात गोळीबारात एक गुंड ठार झाला.