सिक्किममध्ये पुरामधून वाहून आलेला तोफगोळा फुटला

पुरामुळे भारतीय लष्कराची शस्त्रे आणि दारूगोळा वाहून गेला आहे

सिक्किममध्ये पुरामधून वाहून आलेला तोफगोळा फुटला

सिक्किममध्ये आलेल्या पुरामुळे आतापर्यंत ४० जणांचा जीव घेतला आहे. सिक्कीममध्ये ढगफुटीमुळे तिस्ता नदीला पूर आला आहे. अनेक लष्करी तळही पुराच्या पाण्याखाली आल्यामुळे लष्कराचा दारुगोळा आणि शस्त्रेही पुरात वाहून गेली आहेत. असाच एक तोफगोळा प. बंगालच्या जलपाईगुडी येथे पोहोचला. लोकांनी या तोफगोळ्याला स्पर्श करताच त्याचा स्फोट झाला आहे. हा तोफगोळा भारतीय लष्कराचा असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

 

सिक्किमच्या बारदांगमध्ये नदीलगत लष्कराचा एक तळ होता. तिथे भारतीय लष्कराच्या ४१ गाड्या उभ्या होत्या. पुरामुळे या लष्करी तळाकडे असलेला तोफगोळा पुराच्या पाण्यातून वाहून जलपाईगुडी येथे पोहोचला. भारतीय लष्कराने याबाबत पूर्वसूचना दिली होती. सिक्किमच्या पुरामुळे भारतीय लष्कराची शस्त्रे आणि दारूगोळा वाहून गेली आहेत. जर कोणाला भारतीय लष्कराची शस्त्रे आणि दारूगोळा मिळाला तर लगेचच सूचित करा, त्यांना हात लावू नका, असे आवाहन करण्यात आले होते. जलपाइगुडी येथे झालेला स्फोटही याच तोफगोळ्याचा असावा, अशी शक्यता व्यक्त होत आहे. त्यानंतर शुक्रवारी सिक्कीमच्या रौंगपो भागात तिस्ता नदीकिनारी स्फोट झाला.

हे ही वाचा:

आज लोकसभा निवडणुका झाल्यास भाजपचा या राज्यांत निर्विवाद विजय

ऑनलाईन गेमिंग ऍप प्रकरणी बॉलिवूड प्रोडक्शन हाऊसवर छापा

‘डाव्या कट्टरवादाचे दोन वर्षांत उच्चाटन’

कॅनडामधील विमान अपघातात दोन भारतीय ट्रेनी पायलट्सचा मृत्यू

सिक्कीममध्ये आलेल्या पुरात आतापर्यंत सात जवानांसह ४० जणांचा जीव घेतला आहे. तिस्ता नदीमधून आतापर्यंत २२ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. १०० जण अद्यापही बेपत्ता आहेत. अजूनही बचावमोहीम सुरू असून एनआरडीएफ, एसडीआरएफ आणि हवाई दलाचे हेलिकॉप्टर या बचावकार्यात सक्रिय आहेत. सिक्किममध्ये ठिकठिकाणी पुराच्या रौद्ररूपाच्या खुणा दिसत आहेत. अनेक पूल आणि रस्ते वाहून गेले आहेत. सिक्किममधील शेकडो लोकांनी छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे. मोठमोठ्या यंत्रांसह गाड्यांचेही नुकसान झाले आहे.

Exit mobile version