त्याने गोळ्या झेलल्या पण दहशतवाद्यांना सोडले नाही

त्याने गोळ्या झेलल्या पण दहशतवाद्यांना सोडले नाही

प्राण गेले तरी बेहत्तर पण दहशतवाद्यांचे इरादे सफल होऊ देणार नाही असाच निश्चय झूमने केला होता. दहशतवादी गोळ्या झाडात होते पण तो काही त्यांना सोडायला तयार नव्हता. अखेर त्यालाही दोन गोळ्या लागल्या. त्यात तो गंभीर जखमी झाला पण त्याने यश मिळवलेच. हा झूम म्हणजे शनिवारी, जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमधील कोकरनाग भागात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत जखमी झालेला लष्कराचा श्वान. जीवाची बाजी लावणाऱ्या जखमी झूमवर शस्त्रक्रिया करण्यात आली. लष्कराच्या श्वानांची प्रकृती गंभीर असून पुढील ४८ तास वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली असेल पण आता त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचं लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

अनंतनागच्या कोकरनागमधील लढाऊ ऑपरेशनमध्ये, लष्करी कुत्रा ‘झूम’ला दहशतवादी लपलेले घर रिकामे करण्याचे काम देण्यात आले होते. कुत्र्याने त्या घरात जाऊन अतिरेक्यांवर हल्ला केला. ऑपरेशन दरम्यान कुत्र्याला दोन वेळा गोळ्या लागल्या आणि तो गंभीर जखमी झाला.पण त्याने चिवट झुंज देत या दहशतवाद्यांना यशस्वी होऊ दिले नाही.

“जखमा असूनही, त्याने आपले काम चालू ठेवले, त्यामुळे लष्कराने दोन दहशतवाद्यांना ठार केले. लष्कराच्या श्वानावर श्रीनगरमध्ये उपचार सुरू आहेत,” असे अधिकारी म्हणाले. त्यांची प्रकृती स्थिर असली तरी पुढील २४ ते ४८ तास त्यांच्यासाठी महत्त्वाचे असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. भारतीय लष्कराच्या तांगपावासच्या लढाऊ टीमचा हा कुत्रा महत्त्वाचा भाग होता. झूम हा २ वर्ष १ महिन्याचा मालिनॉइस जातीचा कुत्रा आहे आणि गेल्या ८ महिन्यांपासून सेवेत आहे.

हे ही वाचा:

नर्मदा परिक्रमा एक अद्भूत अनुभव

भाजपा शहराध्यक्ष भगीरथ बियांणींनी का केली आत्महत्या?

अनिल देशमुखांचा मुक्काम १ नोव्हेंबरपर्यंत तुरुंगातच

बाळासाहेबांच्या शिवसेनेला ‘ढाल तलवार’news

अनेक मोहिमांचा भाग आहे

झूम दक्षिण काश्मीरमधील अनेक सक्रिय मोहिमांचा एक भाग आहे. “झूम हा उच्च प्रशिक्षित, निर्दयी आणि वचनबद्ध श्वान आहे. त्याला दहशतवाद्यांचा शोध घेऊन त्यांचा खात्मा करण्यासाठी प्रशिक्षित करण्यात आले आहे,” असे अधिकारी म्हणाले. या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचे दोन दहशतवादी मारले गेले, तर अनेक जवान जखमीही झाले.

Exit mobile version