राजोरी-पुंछमध्ये दहशतवाद्यांविरोधात मोठ्या कारवाईची तयारी

सर्व शक्तिनिशी लढण्याचे लष्करप्रमुखांचे अधिकाऱ्यांना निर्देश

राजोरी-पुंछमध्ये दहशतवाद्यांविरोधात मोठ्या कारवाईची तयारी

पुंछमध्ये २१ डिसेंबर रोजी झालेल्या हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेदरम्यान लष्करप्रमुख मनोज पांडे ग्राऊंड झीरोवर पोहोचले. त्यांनी यावेळी सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी संपूर्ण शक्तिनिशी लढा, असे आदेश त्यांनी लष्कर अधिकाऱ्यांना दिले. या दरम्यान राजोरी-पुंछमधील जंगलांमध्ये दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई करण्याची तयारी सुरू आहे.

जनरल पांडे देहराच्या गल्लीतही गेले होते. येथेच दहशतवाद्यांनी लष्करावर हल्ला केला होता. त्यांनी सुरनकोट व राजोरीतील थानामंडीचा दौराही केला. थानामंडीच्या जंगलात पाच दिवस दहशतवाद्यांविरोधात मोहीम सुरू आहे. त्यांनी हल्ल्यात सहभागी दहशतवाद्यांविरोधात कारवाईसंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चाही केली. जनरल पांडे यांनी सर्व शक्तिनिशी ही मोहीम चालवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

हे ही वाचा:

नांदेडजवळ पूर्णा- परळी पॅसेंजर ट्रेनच्या डब्याला आग

सपा खासदार शफीकुर रेहमान याना बाबरी पुन्हा मिळवण्याची हौस!

शेकोटीजवळ हात शेकत असताना भिंत कोसळली आणि…

जय श्रीराम: प्रभू श्रीरामांच्या आजोळातून ३ हजार क्विंटल तांदूळ, सासरकडून सुका मेवा!

नागरिकांच्या मृत्यूंची चौकशी

पुंछमध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या तीन नागरिकांच्या मृत्यूप्रकरणी कोर्ट ऑफ इन्क्वायरी सुरू करण्यात आली आहे. या तीन नागरिकांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांचा अनन्वित छळ झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची लष्करानेही गंभीरपणे दखल घेतली असून एका ब्रिगेडिअरची बदलीही करण्यात आली आहे. ४८ राष्ट्रीय रायफल्सच्या तीन अधिकाऱ्यांविरोधातही कारवाई केली जात आहे. जनरल पांडे यांनी ही चौकशी पारदर्शकतेने करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

तिसऱ्या दिवशीही इंटरनेट बंद

सुरक्षेच्या कारणास्तव पुंछ व राजौरी जिल्ह्यांत सोमवारी, तिसऱ्या दिवशीही मोबाइल इंटरनेट सेवा बंद होती. अफवा पसरून कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी ही खबरदारी घेण्यात आली होती. तीन नागरिकांच्या मृत्यूनंतर खोऱ्यात संतापाची भावना उमटल्यानंतर तातडीने इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली होती.

Exit mobile version