लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यासाठी भेटले नेपाळच्या पंतप्रधानांना

महत्त्वाच्या विषयांवर झाली चर्चा

लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यासाठी भेटले नेपाळच्या पंतप्रधानांना

लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी मंगळवारी काठमांडू येथे नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांची भेट घेतली आहे. नेपाळी लष्कराच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली आहे.

यावेळी दोघांमध्ये सुरक्षेशी संबंधित अनेक मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे सांगितले आहे. याआधी सोमवारी राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांच्या हस्ते त्यांना नेपाळ लष्कराचे मानद जनरल ही पदवी देऊन गौरविण्यात आले होते.

लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे पाच दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर नेपाळमध्ये आहेत. यादरम्यान ते देशातील सर्वोच्च नागरी आणि लष्करी नेतृत्वाशी चर्चा करणार आहेत. ८ सप्टेंबरला ते काठमांडूहून नवी दिल्लीला रवाना होतील.

सोमवारी भारतीय लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी नेपाळची राजधानी काठमांडू येथील लष्कराच्या मुख्यालयात त्यांचे नेपाळी समकक्ष जनरल प्रभु राम शर्मा यांची भेट घेतली. जनरल पांडे यांना सोमवारी नेपाळमधील लष्कराच्या मुख्यालयात गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.

हे ही वाचा:

आता तर ठाकरेंकडे सतरंजी उचलायलाही कुणी नाही

ईडी नशा उतरवणार, दिल्लीसह अनेक राज्यात छापेमारी

नितेश राणे यांच्या गाडीला अपघात पण कुणालाही इजा नाही

थायलंडवासियांची ‘वार्ता आरती’ची पाहिलीत का?

नेपाळी लष्कराने याबाबत ट्विट केले की, जनरल मनोज पांडे यांनी नेपाळचे लष्कर प्रमुख जनरल प्रभु राम शर्मा यांना विविध नॉन-लेटल लष्करी उपकरणे सुपूर्द केली. दुसर्‍या ट्विटमध्ये ते म्हणाले, जनरल पांडे यांनी आर्मी पॅव्हेलियन येथील हुतात्मा स्मारकावर पुष्पहार अर्पण करून शहीदांना आदरांजली वाहिली. भारत-नेपाळच्या लष्करप्रमुखांनी एकमेकांच्या देशाला भेट देण्याची आणि एकमेकांच्या देशाच्या लष्करप्रमुखांना मानद जनरल ही पदवी बहाल करण्याची प्रदीर्घ परंपरा आहे.

Exit mobile version