कोल्हापूरचा पॅरालिम्पिक जलतरणपटू स्वप्नील पाटील याला केंद्र शासनाच्या क्रीडा विभागातर्फे आज अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. पॅरालिम्पिक प्रकारात अर्जुन पुरस्कार मिळविणारा स्वप्नील कोल्हापुरात जिल्ह्यातील पहिला खेळाडू आहे. पुरस्कार जाहीर झाल्याची कळताचं त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतं आहे.
टेबल टेनिस खेळाडू असलेल्या अचंता शरथ कमल याला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला. या पुरस्कार यादीत महाराष्ट्राच्या पाच खेळाडूंच्या समावेश आहे. क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड, नेमबाजी प्रशिक्षक सुमा शिरूर, ॲथलीट अविनाश साबळे, मल्लखांब खेळाडू सागळ ओव्हळकर आणि पॅरा जलतरण खेळाडू स्वप्नील पाटील या महाराष्ट्राच्या खेळाडूंना विविध पुरस्कार सन्मानित केले आहे.
यासोबतचं रोहित शर्मा, शार्दुल ठाकूर यांना घडवणारे दिनेश लाड यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. नेमबाजी प्रशिक्षक सुमा शिरूर यांना ‘द्रोणाचार्य’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. धावपटू अविनाश साबळे, पॅरा जलतरणपटू स्वप्नील पाटील व मल्लखांब खेळाडू सागर ओव्हळकर यांना ‘अर्जुन’ पुरस्कार देण्यात येणार आहेत. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते येत्या ३० नोव्हेंबरला राष्ट्रपती भवन येथे पुरस्कार विजेत्यांना गौरवण्यात येणार आहे.
हेही वाचा :
हत्येपूर्वी श्रद्धाने दिली होती मित्राला हत्येची माहिती
गुजरातच्या एकमेव राष्ट्रवादीच्या आमदाराचाही राजीनामा
लव्ह जिहादची शिकार ठरलेल्या मुंबईतल्या श्रद्धाचे त्याने केले ३५ तुकडे
डोंबिवलीतल्या मुलाचे अपहरण करणाऱ्यांत होत्या तीन महिला, सुखरूप सुटका
स्वप्नील पाटील याला पुरस्कार जाहीर झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला आहे. अर्जुन पुरस्कार मिळाल्याचा आनंद आहे. संघर्षातून मी यश मिळवत आलो आहे. या पुरस्काराचे श्रेय माझे वडील संजय पाटील, आई लता, बहीण अनुराधा यांना तर आहेच; शिवाय ज्या कोल्हापूरकरांनी मला नेहमी प्रोत्साहन दिले त्यांचाही पुरस्कारात मोलाचा वाटा असल्याचा स्वप्नील पाटील याने म्हटलं आहे.