भारतीय बनावटीचे तेजस हवेय अर्जेंटिनाला

जी-२० मध्ये सहकार्यासाठी सहमत

भारतीय बनावटीचे तेजस हवेय अर्जेंटिनाला

अर्जेंटिनाच्या दाैऱ्यामध्ये भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर आणि अर्जेंटिनाचे राष्ट्रपती आणि परराष्ट्र मंत्री यांच्यामध्ये सकारात्मक बैठका झाल्या आहेत. भारतीय परराष्ट्र मंत्र्यांचा दोन दिवसांचा दौरा संपल्यानंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात अर्जेंटिनाने भारतात बनवलेले तेजस लढाऊ विमान खरेदी करण्यात स्वारस्य दाखवल्याचे म्हटले आहे. यासोबतच भारताने जी- २० देशांच्या गटाच्या अध्यक्षपदालाही पाठिंबा दिला आहे.

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी त्यांच्या भेटीदरम्यान अर्जेंटिनाच्या अनेक मंत्र्यांशी विविध विषयांवर चर्चा केली. भारत आणि अर्जेंटिनाचे परराष्ट्र मंत्री सॅंटियागो कॅफिरो यांच्या सह-अध्यक्षतेखाली सर्वसमावेशक आणि संयुक्त आयोगाची बैठकही झाली. या बैठकीत संरक्षण, अंतराळ आणि आण्विक मुद्द्यांसह सामरिक क्षेत्रांचा व्यापक आढावा घेण्यात आला. याशिवाय दोन्ही देशांतील बाजारपेठ, कृषी, पशुसंवर्धन, व्यापार आणि गुंतवणूक यांमध्ये परस्पर प्रवेश वाढविण्यावरही चर्चा झाली.

अर्जेंटिनाने आपल्या हवाई दलासाठी ‘मेड इन इंडिया’ तेजस लढाऊ विमानांमध्ये स्वारस्य दाखवले आहे. दोन्ही देशांच्या संयुक्त निवेदनातही हा मुद्दा नमूद करण्यात आला आहे. भारतीय परराष्ट्र मंत्र्यांनी अर्जेंटिनाच्या हवाई दलासाठी भारत निर्मित तेजस लढाऊ विमानात अर्जेंटिनाच्या स्वारस्याची कबुली देताना द्विपक्षीय संबंधांचे धोरणात्मक महत्त्व अधोरेखित केले.

हे ही वाचा:

‘धर्मवीर’ भेटीला येतायत नव्या रुपात, प्रसाद ओकने केली पोस्ट

जगात भारी पंतप्रधान मोदी!

मुंबई फेरीवाल्यांसाठी लवकरच नवे धोरण

‘या’ दिवशी नागपूरमध्ये सुरू होणार हिवाळी अधिवेशन

भारतही पाठिंबा देईल

संयुक्त निवेदनात फॉकलंड बेटांच्या समस्येचा संदर्भ मालविनास बेटांच्या नावाने आहे. मालविनास बेटांच्या प्रश्नाशी संबंधित सार्वभौमत्वाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी पुन्हा चर्चेला सुरुवात करण्याच्या आपल्या समर्थनाचा भारताने पुनरुच्चार केला. संयुक्त निवेदनात म्हटले आहे की अर्जेंटिनानेही जी- २० देशांच्या अध्यक्षपदासाठी भारताला दिलेल्या समर्थनाची पुष्टी केली आहे. भारतीय परराष्ट्र मंत्र्यांनी भारतीय समुदायाशी चहापानावर चर्चा केली. भारतीय परराष्ट्र मंत्र्यांनी जनरल जोस डी सॅन मार्टिन यांच्या स्मारकाला भेट दिली.

Exit mobile version