मेसीच्या अर्जेंटिनासमोर उरुग्वे ढेर

मेसीच्या अर्जेंटिनासमोर उरुग्वे ढेर

कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अर्जेंटिना विरुद्ध उरुग्वे या सामन्यात अर्जेंटिनाने विजय नोंदवला आहे. १-० या फरकाने सामना जिंकत अर्जेंटिनाने आपली घोडदौड पुढे चालू ठेवली आहे. तर स्पर्धेच्या आपल्या पहिल्याच सामन्यात उरुग्वेला पराभवाला सामोरे जावे लागल्यामुळे स्पर्धेतील त्यांचा पुढचा प्रवास हा कठीण होण्याची शक्यता आहे.

शनिवार, १९ जूनच्या पहाटे कोपा अमेरिका स्पर्धेत अर्जेंटिना विरुद्ध हा सामना पाहायला मिळाला. उरुग्वेचा स्पर्धेतील हा पहिलाच सामना असून विजयी सलामी देण्यासाठी ते उत्सुक होते. तर चिली सोबतच आपल्या पहिल्या सामन्यात एकेक बरोबरी साधून विजयाने हुलकावणी दिल्यामुळे अर्जेंटिना संघही जिंकण्यासाठी प्रयत्नशील होता. मॅचच्या सुरुवातीलाच १३ व्या मिनिटाला रॉड्रीग्जवेजने अप्रतिम हेडवर गोल करत अर्जेंटिनाला आघाडी मिळवून दिली. संपूर्ण सामन्याचा हा एकमेव गोल ठरला असून या गोलच्या जोरावर अर्जेंटिनाने विजय नोंदवला आहे. तरी या विजयासह कोपा अमेरिका स्पर्धेत ब गटात अर्जेंटिना संघ प्रथम क्रमांकावर आहे.

हे ही वाचा:

फिरायला जाणाऱ्यांना पुन्हा पुण्यात आल्यावर १५ दिवसांचा क्वॉरंटाईन

ठाकरे सरकार संविधानिक हक्कांवर गदा आणत गळा घोटण्याचं काम करतंय

शिवसेना आमदाराचा फुकट पेट्रोल भरण्याचा भिकारीपणा

तर दुसरीकडे शुक्रवारी युरो फुटबॉल स्पर्धेतही चुरशीचे सामने पाहायला मिळाले. शुक्रवारच्या पहिल्या सामन्यात झेक रिपब्लिक आणि क्रोएशिया या दोन संघ एकमेकांना भिडले. पण हा सामना अनिर्णयीत राहिला. दोन्ही संघानी एक एक गोल करत बरोबरी साधली होती. तर दुसऱ्या सामन्यात स्विडनने स्लोव्हाकियाला १-० ने हरवले. पण शुक्रवारच्या शेवटच्या सामन्यात इंग्लंड आणि स्कॉटलंड या दोन्ही संघांपैकी कोणीही विजयला गवसणी घालू शकले नाही. या दोन्हीपैकी एका संघाला गोलही करता आला नाही.

Exit mobile version