हैदराबादमधील ईडी कार्यालयाबाहेर तेलंगणा प्रदेश काँग्रेस समितीकडून (टीपीसीसी) काल (१८ एप्रिल) निदर्शने करण्यात आली होती. या निदर्शनादरम्यान ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी खासदार अंजन कुमार यादव यांनी केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांच्याविरुद्ध अश्लील आणि अपशब्द वापरले. या प्रकरणी भाजपाने तक्रार दाखल करत कारवाईची मागणी केली आहे. केंद्रीय मंत्र्याला शिवीगाळ करतानाचा काँग्रेस नेत्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
खरेतर, नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या आरोपपत्राच्या निषेधार्थ काँग्रेसकडून काल देशातील अनेक भागात आंदोलने करण्यात आली होती. याच आंदोलनाचा भाग म्हणून तेलंगणा प्रदेश काँग्रेस समितीनेही आंदोलन केले होते.
या धरणे आंदोलनात तेलंगणा सरकारच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी सहभाग घेतला होता. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी सध्या जपानच्या अधिकृत दौऱ्यावर असल्याने, उपमुख्यमंत्री मल्लू भट्टी विक्रमारका आणि टीपीसीसी अध्यक्ष महेश कुमार गौड यांच्या नेतृत्वाखाली मंत्री आणि आमदारांनी हे आंदोलन केले होते. यावरून सत्ताधारी नेत्यांकडून बरीच टीका करण्यात आली होती.
हे ही वाचा :
भारतात डिझाईन केलेला एआय सर्व्हर ‘आदिपोली’!
रशियाने युक्रेनमधील भारतीय औषध कंपनीच्या गोदामावर क्षेपणास्त्र टाकले?, दूतावासाने दिले उत्तर!
पंतप्रधान मोदींचा एलोन मस्क यांना फोन; कोणत्या विषयांवर केली चर्चा?
‘मी बाजीगर आहे, हार मानत नाही!’
दरम्यान, काँग्रेस नेते अंजन कुमार यादव यांनी आंदोलना दरम्यान केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांच्याविरुद्ध अश्लील भाषेचा वापर केला. ते म्हणाले, अरे गांडू, नपुंसक – तुम्ही काय म्हणालात?, काँग्रेस आंदोलन करत आहे, त्यांना लाज वाटत नाही?
दरम्यान, अंजन कुमार यादव यांच्या वक्तव्यानंतर भाजपाकडून संताप व्यक्त करत टीका केली जात आहे. या प्रकरणी भाजपने अंजन कुमार यादव यांच्याविरुद्ध सैफाबाद पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. भाजप तेलंगणाचे सोशल मीडिया संयोजक सुमिरन कोमाराजू यांनी ही तक्रार दाखल केली. त्यांनी या वक्तव्यांना अत्यंत अपमानजनक म्हटले आणि भारतीय न्याय संहिता आणि इतर संबंधित कायद्यांच्या तरतुदींनुसार त्वरित कायदेशीर कारवाई करण्याचे आवाहन केले.