केजरीवालांच्या शासकीय निवासस्थानी गुंड फिरतोय का? बिभव कुमार प्रकरणी न्यायालयाचा सवाल

‘आप’ला सर्वोच्च न्यायालयाने सुनावले

केजरीवालांच्या शासकीय निवासस्थानी गुंड फिरतोय का? बिभव कुमार प्रकरणी न्यायालयाचा सवाल

आम आदमी पार्टीच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांना मारहाण केल्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने ‘आप’ला फटकारलं आहे. गुरुवार, १ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने बिभव कुमार यांच्यासह ‘आप’ला सुनावलं. न्यायालयाने या हल्ल्याची दखल घेत म्हटले आहे की, “हा धक्कादायक प्रकार असून एका गुंडाने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात घुसून मालीवाल यांच्यावर प्राणघातक हल्ला केला आहे असं वाटत आहे.”

सुनावणीवेळी न्यायमूर्ती म्हणाले की, “बिभव कुमार यांनी जी कृती केली आहे ते पाहून असं वाटतं आहे की एखादा गुंड मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी फिरतोय. मुख्यमंत्र्यांचा शासकीय निवासस्थान हा कोणाचा खासगी बंगला आहे का? मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी अशा गुंडाला स्थान देणं योग्य आहे का?” असे संतप्त सवाल न्यायालयाने विचारले आहेत. स्वाती मालीवाल यांना मारहाण केल्याच्या आरोपांनंतर बिभव कुमार यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी जामीनासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. त्यानंतर बिभव कुमार यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं. मात्र सर्वोच्च न्यायालयानेही त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

हे ही वाचा:

नेमबाज स्वप्नील कुसाळेचा पराक्रम; खाशाबा जाधवांनंतर महाराष्ट्राला ऑलिम्पिक पदक !

अनुसूचित जाती-जमातीच्या आरक्षणात होणार वर्गीकरण

आत्मघाती बॉम्बस्फोटाचा तज्ज्ञ खालेद होणार हमासचा प्रमुख !

मुस्लिम मतांमुळे फडणवीसांवर टीका करण्यासाठी उद्धव ठाकरेंना आला जोर !

बिभव कुमार यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना एक नोटीस जारी केली आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने या प्रकरणावरील सुनावणी पुढच्या बुधवारी म्हणजेच ७ ऑगस्ट रोजी होईल असं सांगितलं.

Exit mobile version