गेले काही दिवस भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर राहणाऱ्या लोकांसाठी एकच विषय चर्चेचा झाला आहे, तो म्हणजे पश्चिम किनाऱ्यावर धडकलेल्या वादळाचा! तौक्ते नावाचे वादळ पश्चिम किनारपट्टीवर येऊन धडकल्याने आत्तापर्यंत कोकण प्रांतात अनेकांचे नुकसान झाले आहे. २०१८ पासून अरबी समुद्रात निर्माण झालेलं हे सलग चौथं वादळ आहे. बंगालच्या उपसागरात वादळ निर्माण होणे ही तशी सामान्य गोष्ट आहे. असं असताना सलग चार वादळं अरबी समुद्रात तयारी झाली, त्याची कारणं अभ्यासणं आणि ती जास्त उचलून घेणं ज्यामुळे जागृती निर्माण होईल, हे राजकीय पातळीवरून फारसे घडताना दिसत नाही. या लेखात आपण या गोष्टींचा विचार करू.
भारताच्या तीनही बाजूंना महासागर आहेत. पश्चिमेला अरबी समुद्र, पुर्वेला बंगालचा उपसागर आणि दक्षिणेला हिंदी महासागर, असे भारताच्या किनारपट्टीला लाभले आहेत. आत्तापर्यंत मान्सुन नंतरच्या काळात बंगालच्या उपसागरात वादळांची निर्मिती होत असे. मुळात वादळाच्या निर्मितीसाठी उष्णतेची गरज असते. तौक्ते वादळ हे देखील आधीच्या वादळांसारखे विषुववृत्तीय वादळ आहे. साधारणपणे समुद्राच्या पाण्याचे तापमान २८ अंश सेल्सियसच्या वर असल्यास त्या ठिकाणी वादळाची निर्मिती होण्याची शक्यता वाढते. बंगालच्या उपसागराचे तापमान जास्त असल्याने पुर्वी त्याठिकाणी वादळांची निर्मिती होणे ही सामान्य बाब होती, परंतु आता परिस्थिती हळूहळू पालटत आहे.
हे ही वाचा:
केदारनाथ मंदिराचे दरवाजे सहा महिन्यांनी उघडले
…आणि इस्लामिक देश आपापसातच भांडले
यावेळी तरी वादळग्रस्तांना ठाकरे सरकारची मदत मिळणार आहे का?
संजय पांडे दोन दिवस रजेवर गेल्याने वादळ
अरबी समुद्राचे तापमानदेखील आता हळूहळू वाढू लागले आहे. त्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर देखील वादळे निर्माण होऊ लागली आहेत. आजच्या द इंडियन एक्सप्रेसच्या एका लेखात लिहील्याप्रमाणे अरबी समुद्राचे तापमान त्यांच्या पृष्ठापासून ५० मीटर पर्यंतचे अधिक गरम झाले आहे. त्यामुळे कोणत्याही चक्रीवादळाला आवश्यक असणारी ऊर्जा या वाढीव तापमानातून या चक्रीवादळांना मिळत आहे. २०१८ मध्ये चक्रीवादळ मेकानु (जे ओमानला धडकलं होतं), २०१९ मध्ये गुजरातला धडक देणाऱ्या वायू आणि त्यानंतर २०२० मध्ये महाराष्ट्राला धडकलेल्या निसर्ग ही सगळी एका मालिकेचा भाग आहेत.
तौक्ते वादळ हे अधिक चिंताजनक यासाठी आहे कारण, तौक्ते अत्यंत धोकादायक होण्यासाठी त्याला २ दिवस लागले होते, तर वायू सुद्धा केवळ ३६ तासात धोकादायक झाले होते. याच्याऊलट यापूर्वी मेकानु वादळ ४ दिवसांनी धोकादाय या सदरात गेले होते आणि निसर्ग वादळाने यासाठी तब्बल ५ दिवस घेतले होते. समुद्राचे वाढते तापमान, एकंदरीतच होत असलेली तापमानवाढ यामुळे वादळे अधिकाधीक धोकादायक तर होत आहेतच, परंतु त्याशिवाय ती त्या प्रकारात देखील अतिशय वेगाने पोहोचत आहेत.
यापूर्वी अनेक वेगवेगळ्या लेखांत प्रसिद्ध झाल्याप्रमाणे यामागे जागतीक तापमानवाढीचा परिणाम आहे. चक्रीवादळांची ताकद ही तापमानावर अवलंबून असते. त्यामुळे तापमान जर वाढत राहिले, तर वादळांची तीव्रता देखील अधिक वाढत जाईल. मूलतः समुद्रावर वादळांची निर्मीत होत असल्याने अरबी समुद्राचे वाढते तापमान हा अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरील प्रत्येकासाठी खरंतर चिंतेचा आणि चिंतनाचा विषय व्हायला हवा. त्यासाठी एकूणच जागतिक तापमानवाढीच्या विरोधात पावले उचलणारी धोरणे आखायला हवीत. यासाठी एका सामुहीक बदलाची गरज आहे.
हे ही वाचा:
डीआरडीओचे कोरोनावरील औषध आता रुग्णांसाठी उपलब्ध
तौक्ते वादळ: मुंबईत दोन तासात १३२ झाडं पडली
टुकार सरकार सत्तेवर असल्यास, राज्यात कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडणारच
कोरोनामुळे नाही उपासमारीने आधी मरू
अधिक धोकादायक होत असलेली वादळे ही वाढत्या जागतिक तापमानाचा ढळढळीत पुरावा आहे. अर्थात धोक्याच्या घंटा ऐकू येणाऱ्यांसाठीच असतात, परंतु अधिकाधीक लोकांनी त्या ऐकल्या तरच वर उल्लेख केलेल्या सामुहीक बदलांना सुरूवात होऊ शकेल, जी बहुदा समाजातूनच झाली तर होईल, अन्यथा राजकीय मार्गाने महाराष्ट्रात केव्हाही संभवत नाही.