लसीकरणाच्या ऐतिहासिक क्षणाला १०० वारसा स्थळांना चढणार तिरंग्याचा साज!

लसीकरणाच्या ऐतिहासिक क्षणाला १०० वारसा स्थळांना चढणार तिरंग्याचा साज!

भारताने कोरोनाच्या लढाईत नुकताच एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. भारताने नऊ महिन्यांमध्ये १०० कोटी लसीचे डोस देण्याचा विक्रम केला आहे. अशी विक्रमी कामगिरी करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. भारताच्या या विक्रमी कामगिरीमुळे कोरोना विरोधातील लढाईला अधिक बळ आणि प्रोत्साहन मिळणार आहे. आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन कर्मचारी, वैज्ञानिक, लसीचे उत्पादक आणि नागरिक या सर्वांच्या कामाचे, मेहनतीचे कौतुक करण्यासाठी आणि हा ऐतिहासिक क्षण आठवणीत राहण्यासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाने (एएसआय) एक अनोखा मार्ग निवडला आहे.

एएसआय या ऐतिहासिक आणि विक्रमी क्षणाचे औचित्य साधून देशातील १०० वारसा स्थळांना भारताच्या राष्ट्रध्वजाची म्हणजेच तिरंग्याची विद्युत रोषणाई करणार आहे. कोरोनाच्या लढाईत मोलाची साथ देणाऱ्या आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन कर्मचारी, वैज्ञानिक, लसीचे उत्पादक आणि नागरिक या सर्वांच्या कौतुकासाठी हा उपक्रम एएसआयने हाती घेतला आहे.

हे ही वाचा:

शाहरुख खान आर्यनच्या भेटीला!

सहकारी साखर कारखान्यांना मिळणार नवसंजीवनी

बापरे! डॉक्टरांनी ‘किडनी स्टोन’ ऐवजी ‘किडनी’च काढली

अभिमानास्पद! १०० कोटी लसीकरण पूर्ण

१९ जानेवारी २०२१ रोजी भारतात या लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली होती. आज भारताने १०० कोटी लसीकरण पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे. अवघ्या नऊ महिन्यांच्या कालावधीत भारत हा विक्रमी टप्पा पार करत आहे. या आधीही भारताने या लसीकरण मोहिमेत अनेक वेगवेगळ्या विक्रमानं गवसणी घातली आहे.

Exit mobile version