गाझामध्ये युद्धबंदीसाठी अरब नेत्यांचा अमेरिकेवर दबाव!

वृत्तसंस्था, जेरूसलेम

गाझामध्ये युद्धबंदीसाठी अरब नेत्यांचा अमेरिकेवर दबाव!

इस्रायलने गाझामधील रुग्णालय, निर्वासितांची छावणी आणि संयुक्त राष्ट्रातर्फे चालवल्या जाणाऱ्या शाळांवर केलेल्या ताज्या हल्ल्यांत सुमारे ६८ ठार झाले आहेत. त्यामुळे इजिप्त आणि जॉर्डनमधील नेत्यांनी गाझामध्ये युद्धबंदी करावी, यासाठी अमेरिकेवर दबाव आणला आहे.

इजिप्त आणि जॉर्डन यांनी अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन यांना गाझामध्ये तातडीने युद्धबंदी आणावी, अशी मागणी केली. शनिवारी इस्रायलच्या सुरक्षा दलाने संयुक्त राष्ट्रातर्फे चालवली जाणारी शाळा (जिथे आता युद्धाने विस्थापित झालेल्या नागरिकांनी आश्रय घेतला आहे.), एक रुग्णालय आणि निर्वासितांच्या छावणीवर हल्ला केला. यात ६८ जण ठार झाले. मात्र ब्लिंकेन यांनी इजिप्त आणि जॉर्डन सरकारचे हे आवाहन धुडकावले असून इस्रायलच्या कारवाईला पाठिंबा दिला आहे. ‘युद्धबंदीची घोषणा करणे म्हणजे हमासला, गाझावर नियंत्रण मिळवणाऱ्या पॅलिस्टिनी दहशतवाद्यांच्या गटाला पुन्हा एकसंध करण्यासारखे आहे,’ असे ब्लिंकन यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

संयुक्त राष्ट्रे आणि अन्य जागतिक शक्ती हे युद्ध कसे थांबवावे, याबाबत अजूनही विचारविमर्श करत आहेत. हमासने ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर दहशतवादी हल्ला केल्यानंतर इस्रायलमध्ये सुमारे १४००जण ठार झाले होते. तर, २४० नागरिकांना ओलिस ठेवले होते. त्यानंतर इस्रायलने हमासविरोधात युद्ध पुकारले असून त्यांनी गाझावर आक्रमण केले आहे. इस्रायलच्या हल्ल्यात आतापर्यंत साडेनऊ हजार नागरिकांना जीव गमवावा लागला आहे.

हे ही वाचा:

आयएएस बनण्याची गोष्ट… सहा गोळ्या लागूनही जिवंत!

शेतांत आग लावण्यास विरोध करणाऱ्या अधिकाऱ्यालाच राब जाळायला लावले!

एल्विश यादव अटकेत नाही किंवा फरारीही नाही

ना डाव्यांची साथ, ना काँग्रेसचा हात; ममता बॅनर्जी ‘इंडिया’तून बाहेर?
इस्रायलच्या संरक्षणदलाने शनिवारी मध्य गाझा पट्टीमधील माघाझी शिबिरावर केलेल्या हल्ल्यात ५१ जण ठार झाले. त्यातील बहुतांश महिला आणि लहान मुले असल्याचे पॅलिस्टिनी वृत्तसंस्था वाफा यांनी सांगितले. तर, रुग्णालयावर झालेल्या हल्ल्यात अनेकजण मारले गेले तर कित्येक जखमी झाल्याची माहिती गाझा आरोग्य मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी दिली. तर, संयुक्त राष्ट्रातर्फे चालवल्या जाणाऱ्या शाळांमध्ये आता निर्वासितांच्या छावण्या उभारण्यात आल्या आहेत. तिथे इस्रायलच्या हवाई दलाने केलेल्या हल्ल्यात १५ जणांचा मृत्यू झाला.

संयुक्त राष्ट्राच्या पॅलिस्टिनीमधील निर्वासितांसाठी स्थापन संस्थेने इस्रायलने शाळेला लक्ष्य केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ‘शाळेच्या मोकळ्या जागेत युद्धामुळे विस्थापित झालेल्या नागरिकांसाठी तंबू उभारले होते. एक हवाई हल्ला येथेच झाला. तर, शाळेच्या आत काही महिला पाव भाजत असतानाच दुसरा हल्ला झाला,’ असे संयुक्त राष्ट्रातर्फे सांगण्यात आले.

Exit mobile version