अकिब मीरने हिंदू भासवून विवाहित हिंदू महिलेला फसवले!

पोलिसांकडून गुन्हा दाखल

अकिब मीरने हिंदू भासवून विवाहित हिंदू महिलेला फसवले!

२० मे रोजी, एका व्यक्तीने आपल्या पत्नीला मारहाण केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर व्हायरल झाला. व्हिडिओमधील व्यक्ती ही जम्मू येथील अकिब मीर आहे. प्रकरणाचा तपास केल्यावर, असे आढळले की, व्हिडिओमध्ये मारहाण करत असलेल्या महिलेला नातेसंबंध जोडण्यासाठी अकिबने आपण हिंदू असल्याचे सांगितले. भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६, ४२०, ४००, ५०४, ५०६ आणि ३४ अंतर्गत आकिबवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

एफआयआरनुसार, पीडिता आधीच विवाहित होती आणि जेव्हा ती अकिबच्या संपर्कात आली तेव्हा तिला एक मुलगा होता. तिच्या तक्रारीत तिने म्हटले आहे की, त्यावेळी ती असुरक्षित स्थितीत होती कारण तिचा नवरा वैद्यकीय समस्यांमुळे त्रस्त होता, ज्यामुळे ती तणावात होती. ओपीइंडियाशी बोलताना पीडितेने खुलासा केला की, तिचा नवरा मद्यपी होता आणि ती त्याच्यापासून विभक्त झाली होती. सन २०२१मध्ये रवी राजपूत नाव असल्याचे सांगून अकिबने तिच्याशी इन्स्टाग्रामवर संपर्क साधला. ते मित्र बनले आणि हळूहळू जवळ आले.

पीडिता विवाहित असल्याची माहिती त्याला होती. काही काळानंतर, तिने तिच्या फोनवर दुसरे सोशल मीडिया ॲप स्नॅपचॅट डाऊनलोड केले. ॲपवर त्याचे नाव अकिब मीर असे पाहून तिला धक्काच बसला. जेव्हा तिने स्पष्टीकरण विचारले तेव्हा त्याने तिला सांगितले की तिचा विश्वास संपादन करण्यासाठी त्याने आपण हिंदू असल्याचे दाखवले, पण तो तिच्यावर प्रेम करतो. त्याने दावा केला की ती आधीच संकटात असल्याने तिला जास्त ताण द्यायचा नव्हता.

तोपर्यंत ते दोघे जवळ आले होते आणि त्याने तिला लग्नाचा प्रस्ताव दिला. तसेच, तिच्या मुलाची काळजी घेईन असे वचन दिले. तिने नकार दिल्यावर लग्न न केल्यास मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली. मुलीला लग्नासाठी न पटवल्यास नातवाची हत्या करू, अशी धमकीही त्याने तिच्या आईला दिली. पीडितेने सांगितले की तिला तिच्या मुलाच्या सुरक्षेबद्दल काळजी वाटत असल्याने ती विचार करण्यासारखी मानसिक स्थिती नव्हती.

एके दिवशी, तो तिच्या मुलाला आणि तिच्या आईला बठंडी येथील त्याच्या घरी घेऊन गेला आणि तिने काही कागदपत्रांवर सही केली तर सर्व काही सोडून देऊ, असे तिला सांगितले. उर्दूमध्ये लिहिलेल्या कागदपत्रांवर तिने आणि तिच्या आईने सह्या केल्याचा आरोप आहे. नंतर तिला कळले की तो निकाहनामा होता. तिला धक्काच बसला आणि त्याबद्दल ती काहीच करू शकली नाही. १५ दिवसांनंतर तिने ४२ लाख रुपयांचे दागिने विकले आणि त्यातील ३२ लाख रुपये आपल्या मुलाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी काही मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरले. ही रक्कम अकिबमार्फत प्रॉपर्टी डीलरला देण्यात आली.

पीडितेने अकिबवर जबरदस्तीने शारीरिक संबंध बनवल्याचा आरोप केला. तिने आरोप केला की, त्याचे अनेक महिलांशी शारीरिक संबंध होते जे त्याने तिला अभिमानाने सांगितले. २३ एप्रिल रोजी तिने त्याला तिच्या नावावर असलेल्या एका मालमत्तेची कागदपत्रे आणण्यास सांगितली, त्यावर त्याने ‘मी तुझ्यावर प्रेम करतो असे तुला वाटते का? मला पैसे हवे होते आणि ते मिळाले. आता गप्प बस नाहीतर मारून टाकीन तुला.’ त्याने तिला घरची कामे कर, हिजाब घाल नाहीतर निघून जा, असेही बजावले होते.

हे ही वाचा:

कॅनडास्थित खलिस्तानी समर्थक अर्श डल्ला, तीन साथीदारांविरुद्ध एनआयएचे आरोपपत्र!

‘भाजपला आधीच ३१० जागा मिळाल्या आहेत, उर्वरित दोन टप्प्यांत ४०० ओलांडणार’

केजारीवालांच्या नावे मेट्रोमध्ये धमकीचा संदेश लिहिणाऱ्याला अटक; आरोपीचा कोणत्याही राजकीय पक्षांशी संबंध नाही

पुणे गाडी अपघात प्रकरणातील अग्रवाल कुटुंबाचे अंडरवर्ल्डशी संबंध?

नंतर तिला समजले की अकिब मीर आणि प्रॉपर्टी डीलरने तिची फसवणूक करण्याचा कट रचला होता. केवळ ते ३२ लाखच नाही तर अकिबने वैयक्तिक वापराच्या नावाखाली १० लाखही काढून घेतल्याचे तिने सांगितले.ओपइंडियाशी बोलताना पीडितेने सांगितले की, ती अकिबच्या घरातून बाहेर पडली होती. तिने सांगितले की, निकाहनंतर काही दिवसांनी त्यांच्यात भांडणे सुरू झाली. त्याला इतर महिलांचे नियमित फोन येत होते. एके दिवशी, तिने त्याचा फोन उचलला आणि दुसऱ्या बाजूला एक महिला होती जिने तिला कळवले की आकिब आदल्या दिवशी तिच्यासोबत होता. दरम्यान, अकिबने तिच्यावर शारीरिक अत्याचार करण्यास सुरुवात केली. मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्यामुळेच त्याला पकडण्यात आल्याचे तिने सांगितले.

ती म्हणाली की सोशल मीडियावर अकिब धर्मनिरपेक्ष असल्याचा दावा करतो पण प्रत्यक्षात तो इस्लामी होता. तो तिला सांगायचा की हिंदू देवांची पूजा करू नकोस आणि हिजाब घालू नकोस.हळुहळू त्याची इतर महिलांशी संबंध ठेवण्याची सवय वाढत गेली आणि जेव्हा ती त्याला विचारत असे तेव्हा तो तिला मारहाण करायचा. त्याने तिला धर्मांतर करण्यास भाग पाडले. एका क्षणी, त्याच्याबरोबर राहणे असह्य झाले आणि तिने त्याचे घर सोडले. पीडितेने सांगितले की, तिचे पूर्वीचे लग्न २००९मध्ये झाले होते. तिने २०१९मध्ये तिच्या मागील पतीला सोडले आणि अलीकडेच अकिबचे घर सोडले.

सोशल मीडियावर, अकिबने आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत आणि दावा केला आहे की हे प्रकरण लव्ह जिहादशी संबंधित नसून मालमत्तेच्या वादाशी आहे. विशेष म्हणजे अकिब यापूर्वी भाजपशी संबंधित होता. सोशल मीडियावर महिलांनी त्याच्यावर अनेक आरोप केल्यानंतर त्याला पक्षाच्या संघटनेतून काढून टाकण्यात आले होते. २०१९मध्ये त्याला भाजयुमोमधून काढून टाकल्याचे पत्रही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

Exit mobile version