कोरोना संसर्ग पुन्हा एकदा देशात डोकं वर काढत असताना लहान मुलांच्या लसीकरणाला परवानगी मिळाली आहे. त्यामुळे आता लवकरच ५ ते १२ या वयोगटातील मुलांच्या लसीकरण मोहिमेला सुरुवात होईल. भारतीय औषध नियंत्रक संस्थेने (Drug Controller General of India) आपत्कालीन वापरासाठी भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन (Covaxin), बायोलॉजिकल ईच्या कॉर्बेवॅक्स (Corbevax) आणि झायडस कॅडिलाच्या झायकोव्ह-डी (Zycov-D) या तीन लसी लहान मुलांना देण्याची परवानगी दिली आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री मानसुख मांडविया यांनी ट्विट करत या संदर्भात माहिती दिली आहे. ६ ते १२ या वयोगटासाठी ‘कोवॅक्सिन’, ५ ते १२ या वयोगटासाठी ‘कॉर्बेवॅक्स’ आणि १२ वर्षपेक्षा जास्त वय असणाऱ्यांसाठी ‘झायकोव्ह-डी’चे दोन डोस देण्यात येणार आहेत. भारताची कोरोना विरुद्धची लढाई आणखी मजबूत होईल असा विश्वास मनसुख मांडविया यांनी व्यक्त केला आहे.
भारत की कोविड से लड़ाई अब और अधिक मज़बूत @CDSCO_INDIA_INF ने
>6 से <12 आयुवर्ग के लिए 'Covaxin'
>5 से <12 आयुवर्ग के लिए 'Corbevax'
12 से ऊपर के आयुवर्ग के लिए 'ZyCoV-D' की 2 डोज को
'Restricted Use in Emergency Situations' की मंज़ूरी दी है।
— Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) April 26, 2022
हे ही वाचा:
एकाच वेळी ७८ हजार २०० तिरंगा फडकवून भारताने केला विश्वविक्रम
संजय राऊत यांच्या विरोधात नागपूरमध्ये तक्रार
किरीट सोमय्यांवर पुन्हा हल्ला झाल्यास शूट ऍट साईट!
हा विजय एसटी कर्मचाऱ्यांचा आणि कष्टकऱ्यांचा
कोरोनाच्या काही व्हेरिएंटचा लहान मुलांना अधिक धोका असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले होते. त्यामुळे लहान मुलांच्या लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत होते. दरम्यान, सध्या कॉर्बेवॅक्स ही कोविड-१९ विरुद्ध भारतातली पहिली स्वदेशी विकसित प्रोटीन सबयुनिट लस १२ ते १४ वयोगटातील मुलांना दिली जात आहे.