पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीने भारतीय सैन्यासाठी प्रगत टोव्ड आर्टिलरी गन सिस्टीमच्या (एटीएजीएस) कराराला मान्यता दिली आहे. ७००० कोटी रुपयांचा हा संरक्षण करार असून या कराराअंतर्गत प्रगत टोव्ड आर्टिलरी गन सिस्टीम खरेदी केली जाणार आहे.
भारताच्या संरक्षण क्षेत्रासाठी एक महत्त्वाचा टप्पा म्हणून, सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीने ७००० कोटी रुपयांच्या प्रगत टोव्ड आर्टिलरी गन सिस्टीमच्या (एटीएजीएस) अधिग्रहणाला मान्यता दिली आहे, जी तोफखाना उत्पादनात स्वयंपूर्णतेच्या दिशेने एक मोठे पाऊल असल्याचे अधिकृत प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. विशेष म्हणजे ही भारतातच डिझाइन आणि विकसित केलेली पहिली स्वदेशी आर्टिलरी गन आहे. सरकारच्या मते, हा करार आर्टिलरी गन उत्पादनात आत्मनिर्भरतेच्या दिशेने उचललेले मोठे पाऊल आहे. १५५ मिमी लांबीच्या या अत्याधुनिक तोफांमुळे भारतीय सशस्त्र दलांच्या क्षमतेत वाढ होणार आहे.
एटीएजीएस ही एक प्रगत टोव्ड आर्टिलरी गन सिस्टीम आहे ज्यामध्ये ५२- कॅलिबर बॅरलची लांब बॅरल आहे. ही ४० किमी पर्यंतच्या विस्तारित फायरिंग रेंजसाठी उपयुक्त आहे. तसेच या प्रणालीमुळे उच्च मारकता प्राप्त होते आणि मोठ्या प्रमाणात स्फोटक भार वाहून नेण्याची क्षमता मिळते. शिवाय, स्वयंचलित तैनाती, लक्ष्य भेदण्याची क्षमता आणि कमी क्रू यामुळे ही प्रणाली अधिक प्रभावी ठरते.
मेक इन इंडियाच्या उपक्रमाचा भाग म्हणून प्रगत टोव्ड आर्टिलरी गन सिस्टीम हे संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) आणि भारतीय खाजगी उद्योग भागीदारांच्या सहकार्याने विकसित केले गेले आहे. त्याचे ६५ टक्क्यांहून अधिक घटक हे देशांतर्गत उपलब्ध आहेत. ज्यामध्ये बॅरल, मझल ब्रेक, ब्रीच मेकॅनिझम, फायरिंग आणि रिकॉइल सिस्टम आणि दारूगोळा हाताळणी यंत्रणा यासारख्या प्रमुख उपप्रणालींचा समावेश आहे. हा विकास केवळ भारताच्या संरक्षण उद्योगाला बळकटी देत नाही तर परदेशी आयातीवरील अवलंबित्व देखील कमी करतो, असे निवेदनात म्हटले आहे.
हे ही वाचा :
जिहादी पद्धतीने वातावरण खराब करणाऱ्या कट्टरपंथीयांकडून वस्तू खरेदी करणार नाही
ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार
अमोल मिटकरी हे औरंगजेबाच्या कुटुंबातले!
दिशा सालियन प्रकरणातील याचिका पाच वर्षांनी दाखल का? वकील निलेश ओझा यांनी दिले स्पष्टीकरण
प्रगत टोव्ड आर्टिलरी गन सिस्टीमचा समावेश हा कालबाह्य १०५ मिमी आणि १३० मिमी तोफा बदलून भारतीय सैन्याच्या तोफखान्याचे आधुनिकीकरण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. देशाच्या पश्चिम आणि उत्तर सीमेवर याची तैनाती सशस्त्र दलांना बळकटी देईल. प्रगत टोव्ड आर्टिलरी गन सिस्टीमच्या मंजुरी आणि उत्पादनामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. याव्यतिरिक्त, जागतिक संरक्षण निर्यात बाजारपेठेत भारताचे स्थान मजबूत होईल आणि भविष्यातील स्वदेशी संरक्षण निर्यातीसाठी मार्ग मोकळा होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.