‘अमृत’च्या सल्लागार पदी विश्वजीत देशपांडे यांची नियुक्ती

अमृत संस्था सारथी महाज्योती धर्तीवर खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी काम करते

‘अमृत’च्या सल्लागार पदी विश्वजीत देशपांडे यांची नियुक्ती

महाराष्ट्र शासनाने स्थापन ‘अमृत’ (अकॅडमी ऑफ महाराष्ट्र रिसर्च अप्लिफ्टमेंट अँड ट्रेनिंग) संस्थेची अमृत विकास सल्लागार समिती काल स्थापन झाली. या समितीत पुण्यातून परशुराम हिंदू सेवा संघाचे अध्यक्ष विश्वजीत देशपांडे यांची निवड सरकारने केली आहे. अमृत संस्था सारथी महाज्योती धर्तीवर खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी काम करते.

सदर समितीची पहिली बैठक शनिवार रोजी पुण्यातील अमृत च्या कार्यालयात संपन्न झाली यावेळी अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी नवनियुक्त सदस्यांचा सत्कार केला तसेच अमृतच्या योजना तळागळापर्यंत पोचविण्यासाठी नियोजन करण्यात आले. यावेळी सल्लागार समिती सदस्य सर्वश्री विश्वजीत देशपांडे निखिल लातूरकर बाजीराव भैय्या धर्माधिकारी क्षितिज पाटुकले अमृतच्या अधिकारी प्रिया देशपांडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

हे ही वाचा : 

राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड!

सीरियाचे राष्ट्राध्यक्ष असद यांच्या राजवाड्यावर बंडखोरांचा ताबा

चिन्मय कृष्णा दास यांच्यासह शेकडो समर्थकांवर गुन्हा दाखल

मेघालयचे डॉ. विद्यानिष्ठ मारक यांना आज ‘अवर नॉर्थ ईस्ट इंडिया ऍवॉर्ड २०२४’ होणार प्रदान

Exit mobile version