महाराष्ट्राचे निवडणूक प्रभारी म्हणून दोन केंद्रीय मंत्र्यांची नियुक्ती!

महाराष्ट्रासह हरियाणा, झारखंड आणि जम्मू-काश्मीरसाठी भाजपकडून निवडणूक प्रभाऱ्यांची नावे जाहीर

महाराष्ट्राचे निवडणूक प्रभारी म्हणून दोन केंद्रीय मंत्र्यांची नियुक्ती!

लोकसभा निवडणुक नुकतीच पार पडली असून आता आगामी काळातील विधानसभेच्या निवडणुकीवर सर्वांचे लक्ष्य लागून आहे. त्याप्रमाणे भाजपने देखील तशी तयारी करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, भाजपने महाराष्ट्रासह हरियाणा, झारखंड आणि जम्मू-काश्मीरसाठी निवडणूक प्रभाऱ्यांची यादी जाहीर केली आहे. भाजपने विविध राज्यातील निवडणुकांची जबाबदारी आता आपल्या वरिष्ठ नेत्यांवर सोपवली आहे.

महाराष्ट्रासाठी निवडणूक प्रभारी म्हणून केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच हरियाणाचे निवडणूक प्रभारी म्हणून केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि सहप्रभारी म्हणून खासदार बिप्लब कुमार देव यांची निवड करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

उबाठा आमदार विलास पोतनीस यांच्यावर गुन्हा दाखल!

ईव्हीएम हॅकचे खोटे आरोप करणाऱ्या राहुल गांधी, आदित्य ठाकरेंनी माफी मागावी

मुंबईतील ६० हॉस्पिटलांना धमकीचे ईमेल!

बकरी ईदला लज्जास्पद कृत्य, बळीच्या बोकडावर लिहिले ‘राम’

यासह पक्षाने मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांची झारखंडचे निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्यासोबत आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना सहप्रभारी बनवण्यात आले आहे. तसेच जम्मू-काश्मीरसाठी जी किशन रेड्डी यांची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

 

 

Exit mobile version