मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी संजय पांडे यांची नियुक्ती

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी संजय पांडे यांची नियुक्ती

पोलीस महासंचालक संजय पांडे यांची मुंबईचे पोलीस आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या या पदी असणाऱ्या हेमंत नगराळे यांची या पदावरुन बदली करण्यात आली आहे. नगराळे यांच्यावर महाविकास आघाडीतील काही नेते नाराज होते त्यामुळे त्यांची बदली करण्यात आल्याची चर्चा सुरु आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील घराजवळ एका गाडीमध्ये जिलेटीनच्या कांड्या सापडल्याने मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणात सचिन वाझेला अटक झाल्यानंतर परमबीर सिंग यांची मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी करण्यात आली होती.

परमबीर सिंग यांची बदली केल्यानंतर हेमंत नगराळे यांच्याकडे पोलीस आयुक्त पदाची सूत्रे सोपवण्यात आली होती. त्यानंतर आता महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय पांडे यांची मुंबईच्या पोलीस आयुक्त पदी बदली करण्यात आली आहे. तर हेमंत नगराळे यांची मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरुन महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबईच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्ती केलेली आहे.

हे ही वाचा:

कुस्तीपटू रवी दहियाने ‘यासार डोगू’ मालिकेत जिंकले सुवर्णपदक!

डोंबिवलीत भाजपा कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला

अजित पवारांनी केले नरेंद्र मोदींचे कौतुक! म्हणाले…

सेबीच्या अध्यक्षपदी माधबी पुरी बुच

कोण आहेत हे नवे आयुक्त?

१९८६ च्या बॅचचे संजय पांडे आयपीएस आहेत. त्यांनी अनेक चांगल्या कामगिरी केल्या आहेत. पांडे हे आर्थिक गुन्हे शाखेत असताना अभ्युदय बँक घोटाळा, चामडे घोटाळ्याची चौकशी करून भ्रष्टाचाराचे प्रकार उघडकीस आणले होते. एसपीजीमध्ये असताना ते माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या संरक्षणात तैनात होते. मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती होण्यापूर्वी संजय पांडे यांच्याकडे राज्य सुरक्षा महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदाबरोबरच राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचाही अतिरिक्त पदभार होता.

Exit mobile version