भाजप संघटन पर्वचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी म्हणून रवींद्र चव्हाणांची नियुक्ती!

भाजपाचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

भाजप संघटन पर्वचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी म्हणून रवींद्र चव्हाणांची नियुक्ती!

भाजप संघटन पर्वचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी म्हणून माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. रवींद्र चव्हाण यांच्या नियुक्तीचे पत्र चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्वीट केले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष पदावर नियुक्ती होईपर्यंत रवींद्र चव्हाण यांच्यावर विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच प्रदेश अध्यक्षांप्रमाणेच रविंद्र चव्हाण यांच्याकडे अधिकार राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्वीटकरत म्हटले, भारतीय जनता पार्टी संघटन पर्व महाराष्ट्र प्रभारीपदी माजी मंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार रवींद्र चव्हाणजी यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

रवींद्र चव्हाण हे एकनाथ शिंदे सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. डोंबिवलीतून ते चौथ्यांदा विजयी झाले आहेत. फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळात त्यांना स्थान मिळेल अशी चर्चा होती. मात्र, त्यांना संधी मिळाली नाही. तर चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आली असून महसूलमंत्रिपद देण्यात आले.

हे ही वाचा : 

‘मंदिर तेथे सामूहिक आरती’ला सोलापुरातून प्रारंभ!

देशमुख हत्येप्रकरणी आरोपींची संपत्ती जप्त होणार!

डॉ. मनमोहन सिंग अनंतात विलीन

जम्मू-काश्मीरमध्ये चमत्कार, मुस्लिम कुटुंबाच्या घरात सापडले शिवलिंग आणि माता वैष्णोदेवीची मूर्ती!

Exit mobile version