महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची निवड करण्यात आली असून राज्य शासनाकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. डिसेंम्बर मध्ये सेवानिवृत्त होणारे रजनीश सेठ हे स्वेच्छा निवृत्ती घेतली असून लवकरच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहे.दरम्यान स्वेच्छा निवृत्तीनंतर रिक्त झालेल्या पोलीस महासंचालक पदी १९८८ बॅचच्या जेष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या नावाची लवकरच घोषणा करण्यात येणार आहे. रश्मी शुक्ला या राज्य पोलीस दलात पहिल्या महिला पोलीस महासंचालक आहे.
राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ हे १९८८ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. राज्य शासनाने सेठ यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एम.पी.एस.सी) चे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत ची अधिकृत घोषणा बुधवारी उशिरा करण्यात आली आहे. सेठ हे डिसेंबर २०२३ रोजी सेवानिवृत्त होत आहे, तत्पूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी निवड होण्यापूर्वी सेठ यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. रजनीश सेठ यांची पाच वर्षांसाठी आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
दरम्यान, रजनीश सेठ यांच्या अध्यक्षपद निवडीनंतर रिक्त झालेल्या राज्य पोलीस महासंचालकपदी जेष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची निवड करण्यात आली असल्याचे कळते. मात्र राज्य शासनाकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली तरी आज सांयकाळ पर्यत शुक्ला यांच्या नावाची घोषणा करण्यात येईल अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
हे ही वाचा:
नांदेडमधील शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
चीनच्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी लवकरच हवाई दल आणखी सुसज्ज
‘डीन’ला स्वच्छतागृह साफ करायला लावण्याप्रकरणी खासदार हेमंत पाटलांवर अॅट्रोसिटीचा गुन्हा
१९८८च्या बॅचच्या जेष्ठ आयपीएस अधिकारी असणाऱ्या रश्मी शुक्ला यांना मुंबई पोलीस पदावरून डावलण्यात आले होते.
भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असतानाच्या काळात शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि पूर्वाश्रमीचे भाजप नेते व विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेस आमदार एकनाथ खडसे यांचे अवैधरीत्या फोन टॅप केले’, अशा आरोपाखाली शुक्ला यांच्याविरोधात मुंबईतील कुलाबा आणि पुण्यात गुन्हा नोंद होता. मात्र पुराव्याअभावी हे दोन्ही गुन्हे न्यायालयात टिकू शकले नाही व दोन्ही गुन्हे रद्द करण्यात आले.