पुणे जिल्हा बँक संचालक पदाचा निकाल जाहीर झाला आहे. पुणे जिल्हा बँकेच्या संचालकपदी रणजित तावरे यांची वर्णी लागली आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा होती.मात्र, आता रणजित तावरे यांची निवड करण्यात आली आहे.
नुकताच पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या संचालकपदाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिला होता.त्यानंतर बँकेच्या संचालकपदी पार्थ पवार यांचं नाव पुढे येत होत.मात्र,अजित पवार यांच्या राजीनाम्यानंतर बारामती तालुक्यातील माळेगावच्या बाळासाहेब तावरे यांचे पुतणे रणजित अशोक तावरे यांची बिनविरोध पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक पदी निवड झाली आहे.
हे ही वाचा:
अफगाण खेळाडूंना इरफान पठाणचा खास पाहुणचार!
जरांगे पाटील यांच्याविरोधात भुजबळांनी दंड थोपटले!
भारताविरुद्धचा पराभव लागला जिव्हारी; संपूर्ण श्रीलंका क्रिकेट बोर्ड बरखास्त
‘अतिमागास वर्गाला कमी लेखण्यासाठी बिहारच्या जातीय सर्वेक्षणात फेरफार’!
आज बँकेच्या संचालक मंडळाची बैठक झाली. त्या बैठकीत अजित पवार यांच्या सूचनेनुसार रणजित तावरे यांची संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. रणजित तावरे हे अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात.रणजित अशोक तावरे हे व्यवसायाने मोठे उद्योजक आहेत. पुण्यात त्यांची १५ टाटाची शोरूम आणि पेट्रोल पम्प आहेत. त्यासोबत छोटे मोठे व्यवसाय पण आहेत. त्यासोबत गेली ५ वर्ष ते राजहंस दूध संस्थेचे चेअरमन म्हणून काम पाहतात. बरोबरच प्रतिभा पतसंस्थेचे चेअरमन म्हणून दोन वर्ष काम पाहत आले आहेत.