अभिनेता आर. माधवन एफटीआयआयच्या अध्यक्षपदी

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी केले जाहीर

अभिनेता आर. माधवन एफटीआयआयच्या अध्यक्षपदी

अभिनेता आर माधवन यांची भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था म्हणजेच एफटीआयआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी यासंबंधित ट्वीट करत आर माधवन यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

माधवन दिग्दर्शित ‘रॉकेटरी: द नंबी इफेक्ट’ या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. या यशाबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असताना त्यांची एफटीआयआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

“एफटीआयआय आणि गव्हर्निंग कौन्सिलच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आर माधवन यांचे हार्दिक अभिनंदन. मला खात्री आहे की तुमचा अफाट अनुभव आणि भक्कम नीतिमत्ता या संस्थेला समृद्ध करेल, सकारात्मक बदल घडवून आणेल आणि तिला उच्च पातळीवर नेईल. माझ्या शुभेच्छा तुझ्या पाठीशी आहेत,” असे ट्वीट मंत्री अनुराग ठाकूर यांनी केले आहे.

एफटीआयआयचे अध्यक्ष म्हणून शेखर कपूर यांचा कार्यकाळ ३ मार्च २०२३ रोजी संपला. आता ही जबाबदारी अभिनेता-दिग्दर्शक आर. माधवनला यांच्याकडे देण्यात आली आहे.

हे ही वाचा:

चांद्रयान- ३ पेक्षाही कमी खर्चात आदित्य L1 सूर्याकडे पोहचणार

जेट एअरवेजचे नरेश गोयल यांना अटक

एका महिलेच्या मानसिक त्रासाला कंटाळून सुधीर मोरे यांची आत्महत्या

राहुल गांधींवर ममता बॅनर्जी नाराज?

आर माधवन यांनी हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीत स्वतःची ओळख बनवली आहे. त्यांनी विविध हिंदी आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसेच कन्नड सिनेमातही त्याने काम केलं आहे. १९९७ मध्ये आलेल्या ‘इन्फर्नो’ या इंग्रजी सिनेमातून त्याने सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं होतं. ‘थ्री इडियट्स’, ‘रहना है तेरे दिल में’, ‘रंग दे बसंती’, ‘गुरु’, ‘तनु वेड्स मनु’, ‘रॉकेट्री द नंबी इफेक्ट’ आदी सिनेमांमध्ये त्यांनी काम केले आहे.

Exit mobile version