राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच एनआयएच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक पदी अतुलचंद्र कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अतुलचंद्र कुलकर्णी हे महाराष्ट्र कॅडरच्या १९९० च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. पुढील एक वर्षासाठी अतुलचंद्र कुलकर्णी यांची प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे.
अतुलचंद्र कुलकर्णी हे सध्या महाराष्ट्र पोलिसांच्या सेवेत असून त्यांना त्वरित महाराष्ट्र पोलीस सेवेतून मुक्त करून एनआयए मध्ये पाठवण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने दिले आहेत. अतुलचंद्र कुलकर्णी हे मूळचे सोलापूरचे असून १९९० आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत. महाराष्ट्र पोलिस दलात नांदेड येथे सहाय्यक अधीक्षक म्हणून रुजू झालेल्या अतुलचंद्र कुलकर्णी यांनी अतिरिक्त पोलिस अधीक्षक (जळगाव) आणि पोलिस अधीक्षक (भंडारा) म्हणून काम केले आहे.
हे ही वाचा:
कराची बाजारपेठेत स्फोट; तीन ठार
रायपूर विमानतळावरील हेलिकॉप्टर अपघातात दोन पायलट्सचा मृत्यू
डी गॅंग कनेक्शनसंदर्भात एनआयएकडून दोघांना अटक
मंत्रालयसमोर कुटुंबासह आत्मदहनाचा प्रयत्न
नागपूर येथील नक्षलविरोधी मोहिमेतही कुलकर्णी यांचे मोठे योगदान होते. मुंबईच्या सहपोलिस आयुक्त गुन्हे शाखेची आणि महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या प्रमुख पदाची जबाबदारीही त्यांनी उत्कृष्टरित्या संभाळली आहे. महाराष्ट्र कॅडरचे अनेक अधिकारी सध्या केंद्र सरकारच्या सेवेत प्रतिनियुक्तीवर आहेत. सुबोध जैस्वाल, रश्मी शुक्ला, समीर वानखेडे आदी अधिकाऱ्यांचा समावेश आहे.