काही दिवसांपूर्वीचं ऍपल कंपनीने आयफोन १६ बाजारात आणला असून या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित आयफोन १६ ची विक्री शुक्रवार, २० सप्टेंबर रोजी भारतात सुरू झाली आहे. त्यामुळे देशभरातील आयफोन प्रेमींनी ऍपल स्टोअरबाहेर फोन खरेदी करण्यासाठी गर्दी केली आहे. मुंबई, दिल्लीतील स्टोअरबाहेर सकाळपासून लोकांनी आयफोन १६ खरेदी करण्यासाठी रांगा लावल्या आहेत.
कंपनीने ९ सप्टेंबर रोजी त्यांच्या ऍन्युएल इव्हेंट ‘इट्स ग्लोटाईम’मध्ये AI फिचर्स असलेली आयफोन १६ सीरिज लॉन्च केली होती. त्यानंतर शुक्रवारी आयफोन १६ भारतात दाखल झाला असून ऍपल स्टोअर्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. पण त्यापूर्वीच मध्यरात्रीपासूनच मुंबईतील बीकेसी येथील स्टोअरबाहेर ग्राहकांनी प्रचंड गर्दी केली असून लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अशीच काहीशी गर्दी आयफोन १५ बाजारात आला तेव्हा लोकांनी केली होती. लोकांनी थेट गुजरातमधूनही या फोनसाठी मुंबई गाठले आहे.
हे ही वाचा :
माजी प्राचार्य संदीप घोष आता नावापुढे डॉक्टर लावू शकणार नाहीत !
हिंदू सणांच्या मिरवणुकीवर दगडफेक आणि ईदच्या मिरवणुकींवेळी भाईचारा
‘गांधी कुटुंबाकडून पंजाबला जाळण्याचे काम’
नंदुरबारमध्ये दोन गट भिडले, गाड्यांची जाळपोळ, तोडफोड!
एका ग्राहकाने सांगितले की, “मी गेल्या २१ तासांपासून रांगेत उभा आहे. काल सकाळी ११ वाजता येथे आलो असून रांग लावून उभा होतो. आज सकाळी ८ वाजता दुकानात प्रवेश करणारा मी पहिलाच व्यक्ती आहे. मी खूप उत्साही आहे.”
#WATCH | Maharashtra: A huge crowd gathered outside Apple store at Mumbai's BKC – India's first Apple store.
Apple's iPhone 16 series to go on sale in India from today. pic.twitter.com/RbmfFrR4pI
— ANI (@ANI) September 20, 2024
आयफोन १६ फोनची किंमत ७९९ अमेरिकन डॉलर्स म्हणजेच साधारण ६७,००० रुपयांपासून पुढे आहे. तर, आयफोन १६ प्लसची किंमत ८९९ अमेरिकी डॉलर्स म्हणजेच साधारण ७५,५०० रुपये आहे. आयफोन १६ प्रो (१२८ जीबी) मॉडेलची किंमत ९९९ अमेरिकन डॉलर्स म्हणजेच ८३,८७० रुपये आहे. आयफोन १६ प्रो मॅक्स (२५६ जीबी) मॉडेलची किंमत ११९९ अमेरिकी डॉलर्स म्हणजेच साधारण एक लाख रुपये आहे. प्रत्येक देशात तेथील स्थानिक कर रचनेनुसार आयफोन १६ सिरीजच्या फोनची किंमत वेगवेगळी असणार आहे.