ॲपलने रशियामध्ये उत्पादनांची विक्री थांबविली, इतर सेवाही केल्या मर्यादित

ॲपलने रशियामध्ये उत्पादनांची विक्री थांबविली, इतर सेवाही केल्या मर्यादित

सातव्या दिवशीही युक्रेन-रशियामधील युद्ध सुरूच आहे. अनेक देशांकडून रशियावर निर्बंध लादले जात आहेत. या दरम्यान दिग्गज अमेरिकन टेक कंपनी ॲपलने देखील रशियामध्ये आपल्या उत्पादनांची विक्री थांबवली आहे. ॲपल कंपनीने ही माहिती दिली आहे. यापूर्वी कंपनीने रशियामध्ये ॲपल पे च्या सेवेवर बंदी घातली होती.

ॲपलने एक निवेदन जारी करून माहिती दिली की, “आम्ही रशियामधील आमच्या विक्री चॅनेलवरील सर्व निर्यात थांबवल्या आहेत, तसेच ॲपल पे आणि इतर सेवा मर्यादित केल्या आहेत. रशियामधील ॲपल ॲप स्टोअरमधून काहीही डाउनलोड केले जाऊ शकत नाही.” निवेदनाचा हवाला देत आम्ही रशियातील सर्व उत्पादनांची विक्री थांबवली आहे.

गेल्या आठवड्यात युक्रेनचे उपपंतप्रधान मायखाइलो फेडोरोव्ह यांनी ॲपलला एक पत्र लिहिले होते, ज्यामध्ये त्यांनी रशियाला कंपनीची उत्पादने, सेवा आणि ॲप स्टोअरमधून काढून टाकण्याची मागणी केली होती. त्यामुळे ॲपलने रशियामधील सर्व विक्री चॅनेलवर निर्यात थांबवली आहे. ॲपलच्या निर्णयानंतर मायखाइलो फेडोरोव्ह यांनी ट्विट करून रशियामध्ये ॲपलच्या उत्पादनांची विक्री थांबवल्याची माहिती दिली. तसेच ॲप स्टोरचा एक्सेस देखील बंद करण्याची मागणी केली आहे.

यापूर्वी, मेटा, गुगल, टिकटॉक आणि यूट्यूबने युरोपमधील रशियन राज्य मीडिया आउटलेट आरटी आणि स्पुतनिक ब्लॉक केले आहेत. युक्रेनमधील रशियाच्या लष्करी कारवायांचा अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आणि युरोपीय संघासह अनेक देशांनी निषेध केला असून मॉस्कोवर निर्बंध लादले आहेत. या देशांनी रशियाशी लढण्यासाठी युक्रेनला लष्करी मदत करण्याचे आश्वासनही दिले आहे.

हे ही वाचा:

विराटचा शंभरावा कसोटी सामना प्रेक्षकांच्या साक्षीने

संजय राऊतांना पुरावे समोर आणायला मुहूर्त मिळेना

आयएनएस विशाखापट्टणम पीएफआरमध्ये प्रथमच सहभागी

युक्रेनमध्ये व्होडाफोनसह अनेक टेलिकॉम कंपन्या देणार फ्री कॉलींग

दरम्यान, रशियन सैन्य खारकीवमध्ये दाखल झाले आहे. रशियन सैन्याने शहरावर क्षेपणास्त्र हल्ले करून मोठे नुकसान केले आहे.रशियन सैन्याने एका रुग्णालयालाही लक्ष्य केले आहे. यानंतर, कीवमध्ये सतत अलर्टचे सायरन वाजत आहेत. युक्रेनच्या महत्वाच्या शहरांना रशियन सैन्य लक्ष्य करत आहेत. युध्याच्या भीतीने आतापर्यंत सात लाख युक्रेनियन नागरिकांनी युक्रेन देश सोडला आहे.

Exit mobile version