इस्लामिक दहशतवाद्यांकडून मारले गेलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक राहिलेले श्रीनिवासन यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. शनिवार, १६ एप्रिल रोजी श्रीनिवासन यांच्यावर दिवसाढवळ्या हल्ला करत त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. केरळमधील पलक्कड जिल्ह्यात हा प्रकार घडला.
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या कट्टरतावादी संघटनेच्या दहशतवाद्यांकडून हा हल्ला करण्यात आला. तलवारी आणि धारदार शस्त्रांचा वापर करून श्रीनिवासन यांच्यावर वार करण्यात आला. या हल्ल्यात श्रीनिवासन गंभीर जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण मृत्यू सोबतची त्यांची झुंज अपयशी ठरली. रविवारी कारुकोडी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हजारो लोक त्यांच्या अंतिम दर्शनासाठी उपस्थित होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टीचे अनेक बडे नेते यावेळी उपस्थित होते.
हे ही वाचा:
कुमार विश्वास यांच्या घरी पोहचले पोलीस; ट्विट करत मुख्यमंत्र्यांना दिला इशारा
सदावर्तेंच्या न्यायालयीन कोठडीत वाढ; कोल्हापूर पोलिसांनी घेतला ताबा
कुतुबमिनारजवळच्या मशिदीसाठी उद्ध्वस्त केली होती २७ मंदिरे
श्रीनिवान यांच्यावर त्यांच्या कुटुंबीयांची जबाबदारी होती. पण त्यांच्या हत्येनंतर कुटूंबातील सदस्यांना अडचणींचा सामना करायला लागू नये यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून पुढाकार घेण्यात आला आहे. त्यासाठी सढळ हस्ते यथाशक्ती आर्थिक मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी बँक खात्याचे तपशील खालील फोटोमध्ये दिलेले आहेत.