27 C
Mumbai
Friday, November 22, 2024
घरविशेषविनोद तावडेंनी राहुल गांधी, खर्गेंना पाठविली १०० कोटींची नोटीस!

विनोद तावडेंनी राहुल गांधी, खर्गेंना पाठविली १०० कोटींची नोटीस!

माफी अन्यथा कारवाईला सामोरे जा

Google News Follow

Related

भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आणि सुप्रिया श्रीनेट यांना नोटीस पाठविली आहे. नोटीसीमधून माफी मागण्याची मागणी करण्यात आली आहे. माफी न मागितल्यास १०० कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल करण्यात येईल असा इशारा विनोद तावडेंनी दिला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या एक दिवसाआधी (१९ नोव्हेंबर) भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे हे नालासोपारा वसई-विरार भागात कार्यकर्त्यांनी निवडणुकी पूर्व कसे काम करावे, मतदानाचा टक्का कसा वाढेल, बोगस मतदान कसे थांबवता येईल याकरिता पालघरमधील एका हॉटेलमध्ये बैठक घेत होते. याच दरम्यान, बहुजन विकास आघाडीचे (BVA) नेते हितेंद्र ठाकूर यांनी हॉटेलमध्ये शिरकाव करत विनोद तावडे हे मतदारांना आकर्षित करण्यासाठी ५ कोटी रुपये वाटत असल्याचा आरोप केला.

विनोद तावडे यांनी ठाकूर यांना समजावण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांनी न ऐकता आपला आरोप कायम ठेवला. यावरून विरोधकांनी विनोद तावडे आणि भाजपवर टीका केली. राहुल गांधी यांनी विनोद तावडे यांच्यावरून पंतप्रधान मोदींना लक्ष केले होते.

दरम्यान, विनोद तावडे आणि भाजपाच्या नेत्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले. विरोधकांकडून जाणीवपूर्वक पूर्वनियोजित कट रचण्यात आल्याचे भाजपने म्हटले. पक्षाचा राष्ट्रीय सचिव पैसे वाटण्यासाठी जाऊ शकतो का?, असा सवाल भाजपाने उपस्थित केला होता. दरम्यान, यावरून आता विनोद तावडेंनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

बदनामी केल्याप्रकरणी विनोद तावडेंनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, सुप्रिया श्रीनेट यांना कायदेशीर नोटीस पाठविली आहे. नोटीसमध्ये तावडे यांनी आपल्यावरील आरोप खोटे, निराधार आणि चुकीच्या हेतूने केलेले असल्याचे म्हटले आहे. राहुल गांधी, खर्गे ,सुप्रिया श्रीनेट यांनी माफी मागणी अन्यथा १०० कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा विनोद तावडे यांनी दिला आहे.

हे ही वाचा : 

ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्राँग रूमच्या सुरक्षेसाठी १० हजार पोलीस

उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या सागर बंगल्यावर महत्वाच्या नेत्यांची बैठक!

दिल्लीत ट्रक प्रवेश रोखण्यासाठी काय पावले उचलली आहेत? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

रेणुकास्वामी हत्या : अभिनेता दर्शनच्या कायदेशीर अडचणी वाढल्या

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा