कुस्ती महासंघाच्या निवडणुका ३० जूनपर्यंत; क्रीडामंत्र्यांनी दिले आश्वासन

क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांचे आश्वासन

कुस्ती महासंघाच्या निवडणुका ३० जूनपर्यंत; क्रीडामंत्र्यांनी दिले आश्वासन

आंदोलक कुस्तीपटूंची भेट घेतल्यानंतर क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुका ३० जूनपर्यंत घेण्यात येतील, असे आश्वासन दिले. माजी अध्यक्ष बृजभूषशण शरण सिंह यांच्यावरील लैंगिक छळाच्या आरोपांची पोलिस चौकशी १५ जूनपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती ठाकूर यांनी दिली.

केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी बुधवारी त्यांच्या निवासस्थानी आंदोलक कुस्तीपटूंची भेट घेऊन भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुका ३० जूनपर्यंत घेण्याचे आश्वासन दिले. कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावरील लैंगिक छळाच्या आरोपांची पोलिस चौकशी १५ जूनपर्यंत पूर्ण होणार असून या तपासाची स्थिती कुस्तीपटूंना कळवली जाईल, असेही ते म्हणाले.

बृजभूषण शरण सिंह यांच्या अटकेची मागणी करणाऱ्या आंदोलक कुस्तीपटूंसोबत तासभर चाललेल्या बैठकीनंतर बुधवारी संध्याकाळी केंद्रीय क्रीडामंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ऑलिम्पिक पदकविजेते साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया हे कुस्तीपटू अनुराग ठाकूर यांना भेटले होते. ‘कुस्तीपटूंशी माझी सहा तास प्रदीर्घ चर्चा झाली. आम्ही कुस्तीपटूंना आश्वासन दिले आहे की १५ जूनपर्यंत चौकशी पूर्ण होईल आणि आरोपपत्र सादर केले जातील. तसेच, कुस्ती महासंघाची निवडणूक ३० जूनपर्यंत घेतली जाईल.

हे ही वाचा:

अखेर प्रतीक्षा संपली; देवभूमीत मान्सूनचे आगमन!

आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा, रेपो रेट जैसे थे स्थितीत

भारताची ताकद वाढणार, ‘अग्नी प्राइम’ ची यशस्वी चाचणी!

लिव्ह-इन पार्टनरची हत्या करून मृतदेहाचे तुकडे मिक्सरमध्ये बारिक केले

’ तीनवेळा भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष राहिलेल्या बृजभूषणसिंह यांची पुन्हा निवड होऊ नये, अशी मागणी कुस्तीपटूंनी केल्याचे अनुराग ठाकूर यांनी सांगितले. तसेच, कुस्तीपटू १५ जूनपर्यंत आंदोलन करणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली. भारतीय कुस्ती महासंघासाठी एका महिलेच्या अध्यक्षतेखाली अंतर्गत तक्रार समिती स्थापन करण्यात येणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.

ठाकूर यांची भेट घेतल्यानंतर कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांनी पत्रकारांशी संवाद साधला. २८ मे रोजी नवीन संसद भवनाकडे मोर्चा काढून कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन केल्याप्रकरणी कुस्तीपटूंवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र हे गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन ठाकूर यांनी दिल्याची माहिती या दोघांनी दिली.

Exit mobile version