प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपट निर्माते अनुराग कश्यप यांनी अखेर ब्राह्मण समुदायाची माफी मागितली आहे. ब्राह्मण समुदायावर केलेल्या जातीयवादी टिप्पणीमुळे त्यांच्याविरुद्ध लोकांनी संताप व्यक्त करत सोशल मीडियावर तीव्र विरोध होऊ लागला होता. हे संपूर्ण प्रकरण वाढल्यानंतर, आता चित्रपट निर्मात्याला आपली चूक कळली आणि त्यांनी कबूल केले आहे की ते त्यांची मर्यादा विसरले होते. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना आज (२२ एप्रिल) त्यांनी एक लांबलचक पोस्ट शेअर केली आणि आपली बाजू मांडत लोकांची माफी मागितली.
सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत म्हटले, ‘रागाच्या भरात एखाद्याला उत्तर देताना मी माझ्या मर्यादा विसरलो आणि संपूर्ण ब्राह्मण समाजाबद्दल वाईट बोलून गेलो. तो समाज, ज्यातील अनेक लोक माझ्या आयुष्यात होते, आजही तिथे आहेत आणि खूप योगदान देतात. आज ते सर्व माझ्यामुळे दुखावले आहेत. माझ्यामुळे माझ्या कुटुंबाला त्रास झाला आहे.
हे ही वाचा :
गिलचा चौकारांचा मारा, रायडूही झाला फिदा!
“राशिद-प्रसिद्धचा कमाल, गुजरातचा केकेआरवर दणदणीत विजय!”
“लोकशाहीमध्ये संसदचं सर्वोच्च!”
बांसुरी स्वराजच्या बॅगेवर ‘नॅशनल हेराल्डची लूट’; पोहोचल्या संसदेत
अनेक बुद्धिजीवी, ज्यांचा मी आदर करतो, ते माझ्या रागाने आणि मी ज्या पद्धतीने बोललो त्यामुळे दुखावले आहेत. अशा गोष्टी बोलून, मी स्वतःच या मुद्द्यावरून माझा मुद्दा बाजूला सारला. मी या समुदायाची मनापासून माफी मागतो, माझ्या बोलण्याचा तसा हेतू नव्हता, परंतु रागाच्या भरात एका वाईट टिप्पणीला उत्तर देताना बोलून गेलो.
पुढे लिहिले की, माझ्या बोलण्याच्या पद्धतीमुळे आणि अयोग्य भाषेचा वापर केल्याबद्दल मी माझ्या सर्व समर्थक मित्रांची, माझ्या कुटुंबाची आणि ब्राह्मण समुदायाची माफी मागतो. पुन्हा असे घडू नये म्हणून त्यावर मी काम करेन. मी माझ्या रागावर काम करेन. आणि जर मला या विषयावर बोलायचे झाले तर मी योग्य शब्द वापरेन. मला आशा आहे की तुम्ही मला माफ कराल, असे अनुराग कश्यप यांनी म्हटले.
मैं गुस्से में किसी को एक जवाब देने में अपनी मर्यादा भूल गया। और पूरे ब्राह्मण समाज को बुरा बोल डाला। वो समाज जिसके तमाम लोग मेरी जिंदगी में रहे हैं, आज भी हैं और बहुत कॉन्ट्रीब्यूट करते हैं। आज वो सब मुझसे आहत हैं। मेरा परिवार मुझसे आहत है। बहुत सारे बुद्धिजीवी, जिनकी मैं इज्जत…
— Anurag Kashyap (@anuragkashyap72) April 22, 2025