आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी अभिनेत्री रुपाली गांगुली यांनी भाजपात प्रवेश केला आहे.बुधवारी (१ मे) दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात अभिनेत्रीचा पक्षप्रवेश पार पडला.विनोद तावडे आणि अनिल बलूनी यांच्या उपस्थितीत अभिनेत्रीने भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
अभिनेत्री रुपाली गांगुली यांना संपूर्ण देश ओळखतो. ‘अनुपमा’ या टीव्ही शो मधून त्या घराघरात पोहचल्या आणि आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांमध्ये एक वेगळीच ओळख निर्माण केली.’अनुपमा’ या टीव्ही शोमध्ये त्यांचा मुख्य रोल होता.२०२० मध्ये कोरोना महामारीच्या काळात सुरू झालेल्या या शोने अनेक विक्रम मोडले आणि ‘सर्वाधिक पाहिलेला’ आणि आता प्रेक्षकांचा ‘सर्वाधिक आवडलेला’ शो बनला.
हे ही वाचा:
राहुल गांधींच्या वक्तव्यावर रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राचा आक्षेप
लैंगिक छळप्रकरणी प्रज्वल रेवण्णा, वडिलांना कर्नाटक एसआयटीचे समन्स!
‘सॉरी पापा’ लिहीत नीटच्या परीक्षार्थी मुलाची आत्महत्या
संपत्ती पुनर्वाटपाचे विचार बाळबोध आणि अज्ञानीपणाचे!
दरम्यान, अभिनेत्री रुपाली गांगुली यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे.पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली.रुपाली गांगुली म्हणाल्या की, देशात चाललेली विकास कामे पाहून मला असे वाटले की, मी सुद्धा यात सहभाग घेतला पाहिजे. तसेच मला तुमच्या आशीर्वादाची आणि पाठिंब्याची गरज असल्याचे अभिनेत्रीने सांगितले.