अभिनेत्री कंगना राणौत यांचा ‘इमर्जन्सी’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहेत. चित्रपटात अनुपम खेर आणि मराठी अभिनेता श्रेयस तळपदे देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. याच दरम्यान, अभिनेते अनुपम खेर यांनी आगामी ‘इमर्जन्सी’ या चित्रपटात दिवंगत राजकारणी जयप्रकाश नारायण यांची भूमिका करण्याचा त्यांचा अनुभव शेअर केला आहे. यासह ‘सर्व वाद बाजूला ठेवून चित्रपटाला प्राधान्य द्यावे,’ असे अनुपम खेर म्हणाले आहेत. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
मुलाखतीत अनुपम खेर यांनी आपल्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटात केलेल्या कामावर भाष्य केले. माजी भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७५ ते १९७७ पर्यंत २१ महिने लादलेली आणीबाणी आणि त्यानंतरच्या परिस्थितीचा आढावा या मुलाखतीमधून घेण्यात आला.
६९ वर्षीय अभिनेत्याने उघड केले की, १९७५ मध्ये आणीबाणी लागू झाली तेव्हा तो नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचा विद्यार्थी होता. त्यांच्या भूमिकेच्या तयारीबद्दल बोलताना म्हणाले, “मला माझ्या भूमिकेबद्दल जास्त संशोधन करावे लागले नाही कारण कंगनाने सर्वांसाठीची तयारी करून ठेवली होती. मला वाटते की आता हीच वेळ आहे जेव्हा लोकांनी या चित्रपटाच्या सिनेमॅटिक तेजाबद्दल बोलायला सुरुवात केली पाहिजे.
हे ही वाचा :
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, अधिसूचना महाराष्ट्राला सुपूर्त!
कंगना राणौत यांनी प्रियंका वाड्रांना ‘इमर्जन्सी’ चित्रपट पाहण्यासाठी केले आमंत्रित!
दहशतवादी मोहम्मद शाहिद खानची जामीन याचिका फेटाळली
गुणवत्ता सिद्ध करण्याची हीच नामी संधी !
ते पुढे म्हणाले, चित्रपट बनवताना प्रत्येक चित्रपट निर्माता हा खूप संशोधन करतो आणि मला विश्वास आहे की कोणत्याही राजकीय विषयावर चित्रपटसृष्टीत बनवलेला ‘हा’ सर्वोत्तम चित्रपट असू शकतो. हा चित्रपट कसा बनला, काय झाले हे सर्व वाद आपण बाजूला ठेवून चित्रपटाला प्राध्यान्य दिले पाहिजे. यावेळी त्यांनी कंगनासोबत काम केल्याचा आनंद व्यक्त केला आणि अभिनेत्रीच्या मेहनतीचे कौतुकही केले.
#WATCH | Mumbai: On his role in the film Emergency, actor Anupam Kher says "I was in the National School of Drama when Emergency was imposed in 1975. I did not have to do much research for the film. Kangana did all the homework for everyone…This will be one of the finest films… pic.twitter.com/DDLGUsuQOW
— ANI (@ANI) January 7, 2025