भजनसम्राट म्हणून ओळखले जाणारे अनुप जलोटा यांच्या भजनाचे अनेकजण चाहते आहेत. अनुप जलोटा अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत राहतात. अनुप जलोटा यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये गायक जलोटा भारताला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करण्याची मागणी करताना दिसत आहेत.
’अनुप जलोटा कारमध्ये बसून कुठेतरी जात आहेत आणि आपल्या चाहत्यांशी संवाद साधताना दिसत आहेत. अनुप जलोटा या व्हिडिओमध्ये संवाद साधतांना भारत आणि पाकिस्तान वेगळे झाले तेव्हा पाकिस्तानला इस्लामिक देश घोषित करण्यात आले होते. कारण मुस्लिमांची संख्या जास्त होती. भारतात हिंदूंची संख्या जास्त असेल तर ते हिंदू राष्ट्र घोषित करावे. चला, अजून झाले नसेल तर आता झाले पाहिजे. कारण या पृथ्वीवर एकही हिंदू राष्ट्र नाही. पूर्वी नेपाळ होता पण आता तोही राखला जात नाही. आपण त्याला हिंदू राष्ट्र म्हणू शकत नाही असे म्हटल्याचे दिसत आहे.
भारत हिंदू राष्ट्र झाले पाहिजे. कारण येथे हिंदूंची संख्या खूप आहे आणि आता त्याची लाट आणखी तीव्र झाली आहे. लोक सामील होत आहेत. त्यामुळे कोणाला काही फरक पडणार नाही. फक्त एक घोषणा करायची बाकी आहे. काश्मीरमध्ये झालेल्या बदलांमुळे कोणाला काय फरक पडला. फक्त शांततेत तर वाढ झाली आहे. लोक तसेही तेथे शांततेच्या वातावरणात राहत आहेत. पूर्वीपेक्षा आता दहशतवादी हल्लेही कमी झाले आहेत, असेही अनुप जलोटा म्हणाले आहेत.
हे ही वाचा:
केअरटेकर म्हणता म्हणता जीवावर उठला! एकाचा मृत्यू
बीबीसीवरील छापे आणि बिळातून बाहेर आले विरोधक
सगळ्यांना हवीहवीशी वंदे भारत; मागणी वाढली
महाशिवरात्रीला घ्या १२ ज्योतिर्लिंगाचे दर्शन
अनुप जलोटा पुढे म्हणतात तसे बघितले तर सर्व काही चांगल्यासाठीच घडत आहे. हे काम लवकर लवकर झाले पाहिजे. मला माझे मत द्यायचे होते, ते मी दिले. आता त्याला चालना देण्यासाठी चर्चा घडवून आणणे गरजेचे आहे.