भारतीय महिला कुस्तीपटू अंतिम पघाल हिने शनिवारी २० वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत जगज्जेती होऊन ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तिने प्रतिस्पर्धी ५३ किलो वजनी गटात युक्रेनची मारिया येफ्रमोवा हिला ४-० ने चित करून जगज्जेतेपद खेचून आणले. त्यामुळे हे विजेतेपद राखणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली आहे. तर, भारतीय महिला कुस्तीपटूंच्या संघाने पहिल्याच सांघिक पदक मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
अन्य भारतीय महिला कुस्तीपटूंनीही या स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. सविता ६३ किलो वजनी गटात आणि प्रिया मलिकने ७६ किलो वजनी गटात २० वर्षांखालील विश्वकप स्पर्धेचे जगज्जेतेपद पटकावले. अंतिम कुंडू हिला ६५ किलो वजनी गटात रौप्य आणि रीनाला ५७ किलो वजनी गटात, आरजूला ६८ किलो वजनी गटात, हर्षिताला ७२ किलो वजनी गटात ब्राँझ पदकावर समाधान मानावे लागले.
हे ही वाचा:
दत्तक हिंदू मुलांवर धर्मांतरासाठी दबाव, १७ वर्षाच्या मुलीवर बलात्कार
हिमाचल मधील ११ हजार घरांचे नुकसान; राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्याची मागणी !
राहुल गांधी नव्या वास्तूच्या शोधात
सुप्रिया सुळेंना मदत करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी कंबर कसली
केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी या शानदार विजयासाठी सर्व महिला कुस्तीपटूंचे अभिनंदन केले आहे. ‘पुन्हा ऐतिहासिक कामगिरी केल्याबद्दल अभिनंदन. दुसऱ्यांदा २० वर्षांखालील जगज्जेतेपद पटकावणारी (५३ किलो) आणि एकमेव भारतीय महिला कुस्तीपटू झालेल्या आणि जगज्जेतेपदाचा किताब स्वत:च्या नावावर कायम ठेवणाऱ्या अंतिमचे खूप खूप अभिनंदन. दुर्दम्य इच्छा आणि महत्त्वाकांक्षाच्या जोरावर भारतीय महिला कुस्तीपटूंनी ही कामगिरी केली आहे. त्यांनी संपूर्ण सामन्यात अविश्वनीय कौशल्य दाखवून आत्मविश्वासाने कामगिरी केली. संपूर्ण देश त्यांच्या या कामगिरीने भारावला आहे. अंतिम, तू खूप चांगली कामगिरी करून दाखवलीस. आता आशियाई खेळांमध्ये तुझ्याकडून उत्तम कामगिरीची अपेक्षा आहे,’ अशा शब्दांत अनुराग ठाकूर यांनी अंतिमचे कौतुक केले आहे.