27 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषदहशतवादविरोधी कारवाया तीव्र होणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बोलावली बैठक

दहशतवादविरोधी कारवाया तीव्र होणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बोलावली बैठक

जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेणार

Google News Follow

Related

जम्मू- काश्मीर भागात गेल्या काही दिवसांमध्ये दहशतवादी हल्ले झाले होते. यानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी संपूर्ण यंत्रणा वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. अशातच दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रविवारी जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. दहशतवादविरोधी कारवाया तीव्र करण्यासाठी शाह यांनी व्यापक मार्गदर्शक तत्त्वे देण्याचीही अपेक्षा आहे.

दहशतवादी हल्ल्याच्या घटना आणि अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेबाबत रविवार, १६ जून रोजी गृहमंत्रालयात उच्चस्तरीय बैठक होणार आहे. ही बैठक केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहेत. नॉर्थ ब्लॉकमध्ये सकाळी ११ वाजता होणाऱ्या या बैठकीत जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल, एनएसए अजित डोवाल, गृह सचिव, आयबी प्रमुख, रॉ प्रमुख, एनआयएचे डीजी, सर्व निमलष्करी दलांचे डीजी, लष्कर आणि हवाई दलाचे वरिष्ठ अधिकारी आणि गृह मंत्रालयाचे इतर अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

अमित शाह यांना जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा परिस्थिती, आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर सैन्याची तैनाती, घुसखोरीचे प्रयत्न, सुरू असलेल्या दहशतवादविरोधी कारवायांची स्थिती आणि केंद्रशासित प्रदेशात कार्यरत असलेल्या दहशतवाद्यांची ताकद याविषयी माहिती दिली जाण्याची शक्यता आहे.

याआधी शुक्रवारीही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीबाबत आढावा बैठक घेतली होती. या बैठकीला गृह मंत्रालयाचे अनेक अधिकारी तसेच जम्मू-काश्मीर पोलिसांचे डीजीपी, सीआरपीएफचे उच्च अधिकारी आणि गुप्तचर विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी गृहमंत्र्यांनी सर्व अधिकाऱ्यांना सुरक्षा व्यवस्थेबाबत काही प्रश्न विचारले आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.

हे ही वाचा..

पंतप्रधान मोदींनी ‘ग्लोबल साऊथ’चे नेते म्हणून भारताची प्रतिमा केली मजबूत

मणिपूरमध्ये हिंसाचार; मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याजवळ भीषण आग

दक्षिण गाझामध्ये लष्करी कारवाईदरम्यान आठ इस्रायली सैनिक ठार

पाऊस आला धाऊन सामना गेला वाहून! भारताचा गटसाखळीतील शेवटचा सामना रद्द

जम्मू-काश्मीरमध्ये चार दिवसांत चार दहशतवादी हल्लेजम्मू-काश्मीरच्या रियासी, कठुआ आणि डोडामध्ये गेल्या चार दिवसांत चार दहशतवादी घटना घडल्या. या दहशतवादी हल्ल्यांमुळे परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे. दहशतवादी जम्मू-काश्मीरमधील शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, त्याला भारतीय सुरक्षा दलाचे जवान सुद्धा प्रत्युत्तर देत आहेत. या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी कठुआमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. उर्वरित दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा