बांगलादेशात हिंदूवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. दररोज अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. कट्टरवादी हल्लेखोरांवर कारवाई मागणी येथील हिंदूंकडून करण्यात येत आहे. मात्र, अध्याप कोणतीही कठोर कारवाई केल्याचे दिसून येत नाहीये. हिंदूंची मंदिर, देवतांच्या मूर्तींना टार्गेट केलं जात आहे. याच दरम्यान, आणखी एका मंदिरावर हल्ला झाल्याचे समोर आले आहे. अज्ञात हल्लेखोरांनी मंदिरात शिरकाव करत दुर्गा मातेच्या मूर्तीची तोडफोड केली आहे.
२२ मार्च रोजी बांगलादेशातील ठाकुरगाव जिल्ह्यातील मसलंदापूर गावात ही हल्ल्याची घटना घडली. कट्टरवाद्यांनी गावात शिरकाव करत गावातील दुर्गा मातेच्या मंदिरावर हल्ला चढवला. मंदिरातील दुर्गा मातेच्या मूर्तीची तोडफोड केली आणि घटनास्थळावरून पळ काढला.
याचे फोटो व्हिडीओ देखील व्हायरल झाले आहेत. मंदिरातील मूर्तींच्या तोडोफोड केल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. स्थानिकांकडून कारवाईची मागणी केली जात आहे. पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. देवीच्या मूर्तींची तोडफोड झाल्याने स्थानिक हिंदूंना अश्रू अनावर झाले. अनेक वर्षांपासून त्याठिकाणी ते देवीची पूजा करत होते, मात्र मंदिरावर हल्ला झाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त करत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
हे ही वाचा :
विग्नेश पुथुर पदार्पणाच्या सामन्यात चमकला!
मुंबईतील ऐतिहासिक बंगल्याची २७६ कोटींना विक्री; यापूर्वीही झालेत असेच कोट्यवधींचे व्यवहार
भारताने उत्पादन-आधारित मॉडेलकडे वळावे
जिथे जिथे हिंदूंची संख्या कमी झाली तिथे त्यांना मारहाण झाली, हिंदूंनी संख्या वाढवावी!
दरम्यान, बांगलादेशामधून नुकताच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये अनेक कट्टरवाद्यांनी घोळका करून एका हिंदू मुलीला लक्ष केले होते. तिला जबर मारहाण करण्यात आली होती. यावेळी अनेकांनी बघ्याची भूमिका घेत व्हिडीओ काढण्यात व्यस्त दिसले. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतरही स्थानिक पोलीस प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही.
Anti-Hindu Pogrom is going on in #Bangladesh.
News coming in from #Thakurgaon district.
On the night of 22/03/2025, unknown miscreants targeted a Maa Durga temple in #Maslandapur village under #Pirganj Upazila.
The culprits vandalised the Murti. pic.twitter.com/TvL0XKwCqO
— Hindu Voice (@HinduVoice_in) March 23, 2025