सोशल मीडियावर कनिका लक्ष्य
गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेला अक्षय कुमारचा नवा रक्षाबंधन चित्रपट अखेर येत्या ११ ऑगस्टला प्रदर्शित हाेत आहे. हा चित्रपट प्रदर्शित हाेण्याच्या आधीच त्याची एका वेगळ्या कारणामुळे चर्चा सुरू झाली आहे. हिंदू व हिंदुत्वाविराेधात सातत्याने लिखाण करणाऱ्या कनिका धिल्लन रक्षाबंधनच्या लेखिका कशा हाेऊ शकतात, असे ट्विट साेशल मिडियावर व्हायरल हाेत असून त्यानिमित्ताने कनिका धिल्लन या वादात सापडल्या आहेत.
गाय वाचवण्याच्या नावाखाली २२ महिन्यात १९ हल्ले, रुग्णालयातील खाटांसाठी प्रतिक्षा केल्यानंतर पाकिंगमध्ये मृत्यू, हे अच्छे दिन आहेत, भारत सुपर पाॅवर आहे. आणि गाे मातेचे मूत्र पिऊन काेविड जाईल. हे आहेत आपल्या देशाचे पाेलिस. संयम, शिस्त, वीरतेचे प्रमाण देताना.. जर बलात्काऱ्याला या देशात इतकी सवलत मिळू शकते तर निदर्शकांना का नाही…अशा प्रकारचे अनेक वादग्रस्त ट्विट कनिका धिल्लन यांनी या आधी केलेले आहेत. हिंदूंच्या आणि हिंदुत्ववाद विराेधात पाेस्ट करणाऱ्या कनिका धिल्लन सारख्या व्यक्तीची पटकथा असलेला रक्षाबंधन चित्रपट आपण कधीही पाहणार नाही, असे शेफाली वैद्य यांनी केलेले ट्विट सध्या व्हायरल हाेत आहे.
So this Hindu-hating woketard is the writer of @akshaykumar’s movie, #RakshaBandhan? I wouldn’t watch ANYTHING this woman is associated with! @KanikaDhillon pic.twitter.com/1LbhOgONZa
— Shefali Vaidya. 🇮🇳 (@ShefVaidya) August 2, 2022
हे ही वाचा:
अल कायदाचा म्होरक्या अल जवाहिरीला ड्रोनने टिपले
माजी मुख्यमंत्री एन.टी. रामराव यांची मुलगी आढळली मृतावस्थेत
राष्ट्रकुल स्पर्धेच्या चौथ्या दिवशी भारताने कमावली तीन पदकं
कुणाला नको आहे संभाजीनगर, धाराशिव नामकरण?
आधी आमीर खानचा लाल सिंह चढ्ढा आणि त्यानंतर अक्षय कुमारचा रक्षाबंधन दाेन्ही प्रेक्षकांच्या निशाण्यावर आहेत. प्रेक्षकांनी या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे मन बनवले आहे. याचे कारण म्हणजे काही वर्षांपूर्वी अक्षय कुमारने ओह माय गॉड या चित्रपटात काम केले होते. त्यानंतर तो मीडियासमोर आला आणि उघडपणे म्हणाला की, आम्ही शिवाला दूध का अर्पण करतो, हनुमानाला तेल का अर्पण करतो. या सगळ्याची गरज आहे, असे देव कधीही म्हणत नाही. आपण जे काही देवाला अर्पण करतो ते एखाद्या गरजूला दिले पाहिजे असे मत व्यक्त केलं हाेतं. इतकंच नाही तर अक्षय कुमारनेही मंदिरांबद्दल भाष्य केले होते आणि मंदिर आपल्या सर्वांच्या आत असल्याचे म्हटले होते. आम्हाला इतर कुठेही जाण्याची गरज नाही. अक्षयने या सर्व गोष्टी २०१२ मध्ये केल्या होत्या.
आज हिंदूंना त्याच्या देवाबद्दल आणि त्याच्या धर्माबद्दल लहानसहान चर्चा देखील सहन करायची नाही. तो आपल्या धर्म आणि संस्कृतीबद्दल जागरूक आहे. रक्षाबंधन चित्रपट प्रदर्शित हाेण्याच्या आधीच आता अक्षय कुमार प्रमाणेच लेखिका कनिका धिल्लन याही नेटिझन्सचे लक्ष ठरत आहेत.