मला ऐकून लोक कंटाळले आहेत या मोदींच्या विधानावर मैथिली म्हणाली बिल्कुल मग…

उपस्थितांमध्ये हास्याची लकेर

मला ऐकून लोक कंटाळले आहेत या मोदींच्या विधानावर मैथिली म्हणाली बिल्कुल मग…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी पहिल्या नॅशनल क्रिएटर्स अवॉर्ड्समध्ये बिहारची प्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूर हिला ‘कल्चरल अम्बेसेडर ऑफ इयर’ने सन्मानित केले. त्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मैथिलीला एक गाणे गायला सांगितले. पंतप्रधानांनी मस्करीत तिला म्हटले, ‘ तूच काहीतरी ऐकव. मला प्रत्येकवेळी ऐकून ऐकून लोक कंटाळले आहेत.’ त्यावर मैथिलीने लगेचच ‘बिलकूल सर’ असे उत्तर दिले. मैथिलीचे हे उत्तर ऐकून मोदी यांनी पुन्हा विनोदाने ‘म्हणजे माझे बोलणे ऐकून लोक कंटाळतात ना?’ असा प्रश्न विचारला. त्यावर मैथिलीने लगेचच ‘मी गाणे म्हणण्याला बिलकूर सर बोलले,’ असे उत्तर दिले. त्यानंतर उपस्थितांमध्ये हास्याची लकेर उमटली.

पुरस्कार मिळाल्यानंतर मैथिली ठाकूर हिने पंतप्रधान मोदी यांच्यासोबत एक सेल्फी व्हिडीओही शेअर केला. त्यात तिने ‘मी आज तुम्हाला (पंतप्रधान मोदी) भेटले. मी खूप आनंदी आहे,’ असे तिने म्हटले आहे. जेव्हा राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेची तयारी सुरू होती, तेव्हा पंतप्रधान मोदी यांनी मैथिली ठाकूरचा एक भजन गातानाचा व्हिडीओ शेअर केला होता. मैथिली ठाकूर बिहारच्या मधुबन जिल्ह्यात राहते.

हे ही वाचा:

पाचव्या कसोटीत टीम इंडिया मजबूत स्थितीत

मालदीवचे माजी राष्ट्रपती नशीद यांनी भारताची मागितली माफी

राहुल गांधी पुन्हा वायनाडमधूनच लढणार

रोहित पवारांना ईडीचा झटका, बारामती अ‍ॅग्रो संबंधित कारखान्याची मालमत्ता जप्त!

पंतप्रधान मोदी यांनी देशभरातील विविध कंटेट क्रिएटर्सना शुक्रवारी पुरस्कार प्रदान केले. ‘आपण सर्वांनी मिळून भारताबाबत सृजन करू. जगासाठी सृजन करू. भारतातून भारताची संस्कृती, भारताचा वारसा आणि परंपरांशी संबंधित गोष्टी संपूर्ण जगाला सांगू. असा कंटेट तयार करू की, त्यामुळे तुमच्यासह देशालाही अधिकाधिक लाइक्स मिळतील, आपण जागतिक दर्जाच्या प्रेक्षकांपर्यंतही पोहोचू,’ असे आवाहन मोदी यांनी केले.

Exit mobile version